*शिक्षकांचे फेव्हरेट विद्यार्थी*😊
*शिक्षकांचे फेव्हरेट विद्यार्थी* 😊 नियमित अभ्यास करणं, कुठेही वेळ पाळणं, हाती आलेलं/घेतलेलं काम जबाबदारीने पार पाडणे, प्रामाणिक असणे, अभ्यास आणि मजा या दोन्हीचा समतोल साधणं, syllabus पेक्षा पुढे किंवा त्याहून अधिक वाचन करणं, अवांतर गोष्टी बघणं, वाचणं, मलाच खूप कळतं याहून समोर असलेल्या माणसाचाही काही अनुभव असतो यावर विश्वास ठेवणं, शिक्षकांप्रती विनम्र भाव असणं, सतत नवीन काहीतरी करून बघण्याची आस, आपलं काम जिद्दीने आणि निष्ठेने पूर्ण करणं, वेळेचं योग्य नियोजन, गरज आणि महत्त्व जाण ून काम करणे साधारण असे गुण असले की विद्यार्थी शिक्षकप्रिय असतात. शाळा कॉलेजात हे असे गुण रुजायला हवेत असा कोणाचाही अट्टहास असण्यात काय हरकत आहे! आता असतं असं की मुलांचे 'करियर ऑप्शन्स' ठरलेले असतात किंवा त्यात त्यांनी आधीच काम करायला सुरुवात केलेली असते. आर्टस् मध्ये असं खूप होतं की मुलं नुसती पदवी असावी हाताशी म्हणून शिकतात. अधिकतर भाषा विषयांसाठी. त्यामुळे त्यांची धारणा अशी असते की कॉलेजला काय (वर उल्लेखलेले) शिस्तीचे गुण पाळायचे वगैरे वगैरे... पण माझं निरीक्षण असं आहे की नुसत्या अभ्यासस...