पण तू मात्र तसाच राहतोस...

गोष्टी बदलतात
धूसर होतात
नाहीशा होतात
या सगळ्यात
तू मात्र तसाच राहतोस
पुरोगाम्यांच्या पोस्टी पडतात
समर्थकांची उत्तरे येतात
लोक इकडून तिकडे जातात
या सगळ्यात
तू मात्र तसाच राहतोस
बॉम्बेची मुंबई होते
एल्फिन्स्टन प्रभादेवी होतं
औरंगाबाद बदलायचा विचार होतो
या सगळ्यात
तू मात्र तसाच राहतोस
लोक नवीन शहरं वसवतात
शहरच्या शहरे देशोधडीला लागतात
घर म्हणून लोक इमारत बांधतात
या सगळ्यात
तू मात्र तसाच राहतोस
लोक हसणाऱ्यांवर टीका करतात
हसवणाऱ्यांवर टीका करतात
रडणाऱ्यांवरही टीका करतात
या सगळ्यात
तू मात्र तसाच राहतोस
तुला नेहमीच कसं जमतं
किनाऱ्यावर राहून तटस्थ जगायला
मी याच विचारात असते
पण या सगळ्यात
तू मात्र तसाच राहतोस
विरोध करणाऱ्यांना निदान एक बाजू आहे
मी त्याबद्दल बोलताना
मलाही एक बाजू आहे
माझी नित्य बडबड ऐकतानाही
तू मात्र तसाच राहतोस
कोणी love करतं
कोणी angry होतं
कोणी sad तर कोणी haha
या सगळ्यात
तू मात्र नुसतं like होतोस
तुझं तसंच असणं कधी कधी
फारच विचित्र वाटतं
हे नैराश्याने आलेलं तटस्थपण आहे
की तुला खरंच काही मत नाहीय
की आणखी काही...
या सगळ्यात मी मात्र गुंतते
मग पुन्हा माझी एक बाजू...
दुसरी बाजू तयार होते
पण या सगळ्यात
तू मात्र तसाच राहतोस
- आनंदी_अश्विनी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "

सासर-माहेरच्या गोष्टी