बाणगंगा - एक संध्याकाळ



रात्र सुंदर, चंद्र सुंदर
रात्र काळी होत शाई, मन्मनाच्या कागदांवर
हे निघाले तारकांचे संथ तांडे डोंगराशी
रात्र थकल्या काफिल्यापरी
उतरणीवर चहूदिशांशी
हे निघाले दव धुळीचे लोट अन् आले धरेवर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर
शांतता ही काय वर्णू, तव मिठीसम आर्त सुंदर
चांदण्याने बहकलेल्या रात्रीचे या हर गात्र सुंदर
या तुझ्या अनिवार सयीचे जीवघेणे सत्र सुंदर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर
रात्र ओला शब्द मागे, या जिण्याचा अर्थ मागे
निरवतीच्या अक्षरांवर एक हळवी रेघ उमटे
रात्र वेडी, चंद्र वेडा, वेड माझे येई भरावर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर
- संदीप खरे
फोटो:
By आनंदी_अश्विनी
@बाणगंगा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "

सासर-माहेरच्या गोष्टी