सहज आनंद व्यक्त करणं ही पहिली पायरी...
फार सोप्प असतं आनंदी राहण! पण आनंदी राहायला
आपल्याला मोकळेपणाने वावरता यायला हवं! निखळ जगता यायला हवंय! आणि तेच जास्त कठीण
असतं!
आपण प्रत्यक ठिकाणी मणामणाची ओझी वाहून जगतो! नको
तिथे शिष्टाचारांचं ओझं! समोरचा काय विचार करेल याचं ओझं! पत सांभाळण्याच ओझं!
आपल्याला अगदीच साधं तर consider करणार नाहीत ना याचं ओझं! आपण
सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत हे स्टेट्स जपण्याचं ओझं! आणि एरवी जबाबदाऱ्या, नोकरी,
घर, संसार, अडचणी, रोजच्या समस्या या सगळ्याची
कायमस्वरूपी ओझी आपण वाहतच असतो.
आणि या सगळ्या मोठ्या ताण-तणावात छोट्या छोट्या
गोष्टींवर व्यक्त होणंच राहून जातं. हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो पण अमलात आणणं राहून
जातंय हे मात्र आपण विसरतो. व्यक्त होताना आपण किती जास्त विचार करतो इतका तर
कोणावर टीका करताना कोणाविषयी गॉसीप करतानाही करत नाही. फार छोट्या गोष्टी असतात...
कोणाचं शर्ट छान वाटलं, कपडे सुंदर वाटले, कोण सुंदर
दिसत असेल तर आपण अनेकदा सांगतच नाही. अर्थात आजकाल दिसण्यावरून काही म्हणणं
म्हणजे भीती वाटते! पण विश्वासातल्या माणसांना आपण सहज सांगावं की! खास करून
आपल्या घरातली माणस आपली मित्र मंडळी, कामावरचे लोक ज्यांच्यासोबत आपण दिवसातला
ठराविक काळ रोज नेमाने असतो. त्या माणसांशी तरी मोकळं राहण्याचा प्रयत्न करायला
हवा ना! काय आड येतं नेमकं थेट कौतुक करण्यात याचा विचार आपणच करायला हवा!
तुम्ही असू शकता introvert! मीही आहे बऱ्याच प्रमाणात! मात्र या virtual जगात मी मोकळेपणाने व्यक्त व्हायला शिकले. शिकायला हवंय आपण. पण इकडे likeच्या पुढे व्यक्त व्हायलाही संकोचणारे, पोस्ट वाचूनही अजिबात व्यक्त न होणारे
( पण नंतर काधीतरी मी तुझं सगळंच वाचते/ वाचतो हं! असं म्हणणारे), बरेच लोक आपल्या
फ्रेंड लिस्टमध्ये आपल्या फार ओळखीचे असतात असं नाही पण त्यांची एखादी पोस्ट नजरेत
आली आणि आवडली तर काय जातं like ठोकायला? फार संयत कोणी व्यक्त
झालं असेल तर एखादी कमेंटही करताना आपण का इतका विचार करतो! वैयक्तिक वाद-
हेवेदावे असतात तो भाग वेगळा (तेही विसरू शकतोच पण इगो आपला मोठा असतो जयकांत
शिक्रे सारखा) पण सामान्यपणे आपण हे करूच शकतो! फेसबुक, insta
वरचे अनेक सेलिब्रिटी फार सहज हे करून जातात कधी कधी. आवडलं तर like करतात कधी कमेंट करतात आपण त्यांच्याकडून हा गुण नक्कीच घेऊ शकतो.
कधीतरी करून बघा.. फार मोकळं वाटतं आणि निखळता येते
सहज वागण्यात! अर्थात किती कुठे व्यक्त व्हावं याची आपल्याला जाणीव असते आणि हे
भान बाळगूनही आपण कौतुक करू शकतो!
फक्त स्वतःच कौतुक ऐकून आनंद होतो का? अजिबात नाही! मित्र-मैत्रिणीच्या achievement वर, त्यांच्या
आयुष्यातील घडलेल्या मस्त गोष्टींचा आनंद कधीतरी स्वतःहून celebrate करून बघा! कोणी त्यांच्या आयुष्यातील खूप आनंदी
गोष्ट शेअर केली तर त्यावर तितक्याच आनंदाने शुभेच्छा देऊन बघा! कोणी दु:ख शेअर
केलं तर आपण सहानुभूती, सांत्वन करतो लगेच मात्र तितक्याच उत्साहाने कोणाच्या
आनंदात सहभागी होतो का हा विचार करायला हवा. आपण असे झालो की आपोआपच आपल्याला ताशी
माणस भेटत जातात. आणि हे वागणं तुमच्या चेहऱ्यावर सतत एक वेगळा तजेला आणत हे नक्की!
( that too without any skin care) खरंतर त्वचेची काळजी काय एकूणच शरीराची काळजी ही मनाच्या काळजीवर अवलंबून असते.
आपण स्वतःनेच इतके भरून जातो की समोरच्या व्यक्तीचा
आनंद साठवायला आपल्याकडे जागाच उरत नाही...
आपण दु:खाला खूप महत्त्व देतो! आजूबाजूला घडणाऱ्या
घटना आपल्यातलं नैराश्य जागृत करत असतात.. पण आनंदी राहायचा नुसता संकल्प करून बघा...
त्यासाठी सहज आनंद व्यक्त करणं ही पहिली पायरी आहे... आणि तुम्हाला जाणवेल की हाच
आनंद हळूहळू तुमचं सामर्थ्य असेल.
हे लिहिता लिहिता संदीपची एक कविता आठवली.. यातला ‘तो’
मला व्हायचंय. तुम्हाला?
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो
कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो.
मी
जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो
सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी
बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो
लंघुन चौकट पार निघाया बघतो.
डोळ्यात
माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात
त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो
त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून
दागिने सुर्यफुलांपरी झुलतो.
मी
पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो
त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो,
मी
डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो
स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो.
मी
आस्तिक मोजत पुण्याईची खोली,
नवसांची
ठेवून लाच लावतो बोली,
तो
मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन
धन्यवाद देवाचे घेवून जातो.
मज
अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो
न परि चेहरा आत भेसूर,
तो
फक्त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या
शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो.
– मौनाची
भाषांतरे, संदिप
खरे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा