ट्रेन,प्रवास आणि मी



☺ट्रेन,प्रवास आणि मी ☺

झूक झूक आगीनगाडी या गाण्यातून आणि मग खेळातून आपल्या आयुष्यात आनंद आणणारी ट्रेन मोठं झाल्यावर नकळत आपल्या जीवनाचा आनंददायी भाग बनते .. हे किती मस्त आहे.
आपण सर्वच जण प्रवास करतो .. प्रवास कुणाला आवडत नाही!!
पण या प्रवासाची माध्यमं आपल्या आपल्या खास आवडीची असतात .. जसं बस,रेल्वे,विमान,गाडी वगैरे वगैरे
पण माझा आवडीचा प्रवास तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात ट्रेन असते.
ट्रेन आणि मुंबईकरांचं नातं हे अगदी सलगीच्या सख्य्या मैत्रीसारखा .. बोरिवलीला राहून गिरगावात महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे माझी आणि ट्रेनची गट्टी जमणं हे अगदी साहजिक आणि अपरिहार्यच..
गावी जाताना होणाऱ्या त्या निळ्या ट्रेनचा प्रवास मात्र नेहमी लक्षात राहतो आणि दुसऱ्या रंगाची राजधानी आणि दुरांतो सुद्धा ....
प्रवासात मी अबोल असते जास्त बोलत नाही, फक्त न्याहाळत असते.
पण तरी रोजच्या तास दीड तासाचा प्रवास असो वा अगदी दोन दोन दिवसाचा ट्रेन प्रवास असो आठवणींनी मात्र समृद्ध करतोच आणि काहीतरी नवीन देतोच ..
पहिल्या प्रवासातला कुतूहल मात्र नक्कीच अजूनही लक्षात आहे.. जे या जाहिरातीत अगदी अचूक दाखवलंय.
प्रत्येक स्थानकावर उतरून केकलेली मजा,काढलेले फोटो.. ट्रेनच्या दरवाज्यात बसून केलेला प्रवास,खिडकीतून येणारे पावसाचे शिंतोडे झेलत मनात गायला जाणारा मल्हार.. आणि पावसाळ्यात लोकल ट्रेन मध्ये आपसूकच मिळणारी खिडकीजवळची जागा .. वाह वाह
याच ट्रेन प्रवासात कधी काही सलगीने चौकशी करणारी माणसं भेटतात .. तर कधी तासाभराच्या ओळखीत मोकळी होणारी मने भेटतात ..
रोजच्या लोकल ट्रेनच्या त्याच भेटीतही एक वेगळीच दुनियादारी असते.
लांब पल्ल्याच्या ट्रेनचा प्रवास मात्र नेहमी आठवणींची ओंजळ भरतोच. लहानपणी भावंडं आणि कुटुंबासोबतचा प्रवास ते नंतर मित्र मैत्रिणींसोबत केलेला हा प्रवास कित्येकदा मने जुळवण्यात आणि जवळ आणण्यात मदत करतो ..
आजही त्या वरच्या बर्थ वर बसून भावंडांसोबत केलेली मस्ती आणि मित्र मैत्रिणीसोबत मारलेल्या गप्पा मनाला आनंद देतात.
हल्ली एकट्याने केलेल्या प्रवासात जोडली गेलेली माणसे किंवा तात्पुरत्या वेळेसाठी गप्पामधून मोकळी झालेली माणसं,TC शी होणाऱ्या गप्पा .. ट्रेन म्हणजे एकाच वेळी अनेक आयुष्य आपल्यासमोर मांडणारी एक जागा आहे .. जिथे कित्येकदा ओळख नसताना मनांचं,भावनांचं आणि खूपदा माणुसकीच शेअरिंग होत.
वाईट अनुभव सगळीकडेच असतात पण यासोबतच ट्रेन जे आनंदच गाठोडं देते ते जपून ठेवण्यासारखच आहे.
त्यामुळे या सगळ्यांना वाहून नेणारी ही ट्रेन आणि आपलं नातं नसेल तरच नवल!!
मी प्रत्येक प्रवास मस्तच मजेत केलाय आणि प्रत्येक प्रवासाची विशेष आठवण आहेच....
लांब पल्ल्याच्या ट्रेन मधले कुटुंबासोबतचे खूप किस्से आहेत पण तरी मित्रांसोबतच्या ट्रेन प्रवासाच्या आठवणीत माझ्या नेहमीच विशेषत्वाने लक्षात राहतील असे ..
Kshitij Naikade आपला राजधानी प्रवास :D आणि तू माझी घेतलेली #काळजी ;) :*
Anagha Pendse आपला गुजरात प्रवास आणि आपण रात्री जागून खेळलेले पत्ते (तुझ्यामुळे मी पत्ते शिकले :P )
आणि न विसरता
Tanmayee Pathreउगाच आणि अचानक घडलेली आपली लोणावळा सफर <3 :*
काय सुंदर बनवलीय ही जाहिरात... Thank You Paper Boat :D :D
-आनंदी 😇😆
जगह कम थी मगर ट्रेन का दिल बहोत बडा था..


https://youtu.be/B3mgkHhn2x0



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "

सासर-माहेरच्या गोष्टी