कसं व्यक्त होतो हेही महत्त्वाचं!

काही दिवसापासून चाललेला #tiktok वाद आणि हल्ली काही दृष्टीस पडलेली memes पाहून बराच वेळ मनाशी चाललेली चर्चा इथे लिहिते...
सलमानचा तो किस्सा आठवतोय का कुठल्यातरी चित्रपटात आपल्या भूमिकेसाठी त्याने इतकी मेहनत घेतली होती की त्यासाठी माझ्यावर बलात्कार झाल्यासारखं वाटलं अशी काही उपमा वापरली होती... अर्थात त्याला हे शब्दशः म्हणायचं नव्हतं! असं तो म्हणालाही, त्याने माफीही मागितली.

टिक टॉकविषयी बोलताना #Carryminaty आणि त्याला पाठींबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने तिथल्या मुलांना छक्का, मुली, बेटी ही संबोधनं वापरली. लाखो लोकांनी याच शब्दांसह हे शेअर केलं कोणालाच यात गैर वाटलं नाही.
एखाद्या मुलाचं किंचितसं वागणं आपल्याला मुलीसारखं जाणवलं की आपण लगेच त्यांना लेबल्स लावतो. आता ही विशेषणं काय असतात हे वेगळ्याने मी सांगायला नको!!!
कुठेही काहीही होवो आपण आपला राग व्यक्त करण्यासाठी, आपण स्वतःला सो called विनोदी समजतो किंवा फारच Sence of humour असल्याचं समजतो तेव्हा आपण त्या त्या व्यक्तीच्या लिंग, Sexuality, शरीरावर विनोद करतो,टीका करतो. (आपल्या शिव्यांविषयी काही बोलायला नकोच) आणि आपल्यापैकी कित्येक जणांना यात काही चूक आहे असं वाटतंच नाही.
हे न वाटण्यामागचं कारण म्हणजे हे शब्द आपल्या इतके रोज कानावर पडतात आणि आपण ते इतके सर्रास/ सहज वापरतो, की यात काय चूक आहे असा प्रश्न आपल्याला पडतो. ठराविक समुदायासमोर एखादी कृती सतत होऊ लागली की आपल्याला त्या समुदायाचा एक भाग म्हणून त्यात काही चुकीचं वाटेनासं होतं. (उगाचच का आपल्याकडे अनिष्ट प्रथा चालू राहतात!)
रागात आणि विनोदात, किंवा सहज (i didn't mean that वाल्या) संवादात कोणाला छक्का, मुलगी, स्त्री, पुरुष, गे, लेस्बो, जाड्या, सुकड्या, लंगड्या, आंधळ्या, शारीरिक, मानसिक उणिवा दर्शवणारे आणि बरेच शब्द जें कदाचित तुम्हाला अधिक माहित असतील! हे शब्द वापरून समोरच्याला हीन, तुच्छ लेखले जाते.
इथे फेसबूकवरही वैचारिक वादात काही हाती येईनासे झाले की लोक या मुद्द्यांकडे वळतात.
ही आपली प्रखर किळसवाणी बुद्धी दाखवण्याआधी दोन सेकंद थांबा आणि विचार करा. विवेकबुद्धी जागृत असेल तर आपण एक व्यक्ती, माणूस, समाजाचा भाग म्हणून आपल्याला या शब्दांचा so called विनोद किंवा शिवी किंवा तुच्छता दर्शवण्यासाठी वापरण्याचा अधिकार नाहीय. हे जरा स्वतःला समजावून सांगायला हवं तेही अगदी कठोरपणे.

आणि सामाजिक माध्यमांवर व्यक्त होताना आपण कोणते शब्द वापरावेत. कसं व्यक्त व्हावं, निखळ विनोद कसा करावा, कोणत्या गोष्टींवर बोलू नये हे सगळं जाणून घ्यायला हवं. वापरलेला प्रत्येक शब्द आपल्या जडण-घडणीचे दाखले देत असतो. फक्त चार माणसात बोलतानाच नाही तर स्वतः एक माणूस म्हणून स्वतःशी बोलतानाही वेदना संवेदना develop झाल्यात ना हे चेक करायला हवं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

सासर-माहेरच्या गोष्टी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "