गोष्ट दूर कुठेतरी घडते...

गोष्ट दूर कुठेतरी घडते...
काय घडलं याची गोष्ट कळते
गेलेल्या बळीबद्दल कळते
बळी घेणाऱ्यांबद्दल कळते
मतं व्यक्त होतात
वाचली जातात लिहिली जातात
दुर्लक्ष केलं जातं
माणसं मूक होतात, केली जातात
तीव्रता वाढत जाते
खटले भरले जातात
सिद्ध होतात
दाबले जातात
वातावरण संवेदनशील होते
तपास चालू राहतो
वेळ जातो, विषय बदलतात
संवेदनशीलतेचे मोर्चे वळत राहतात इकडून तिकडे
एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये म्हणून
खूप कष्ट घेतले जातात
पण दोषी यामुळे मोकाट होतात हे विसरलं जातं
पण पद्धत हीच आहे
तत्क्षणी शिक्षा हे फक्त आपण शब्दांमध्ये बघायचं
आणि हे अनुसरावं लागेलच कारण त्यात बदल होत नसतो
मग आपण फार व्यापक आत्मकेंद्री होत म्हणायचं
मी माझ्या मुलांना चांगला माणूस व्हायला शिकवेन
मुलींचा आदर करायला शिकवेन
लैंगिक शिक्षण देईन वगैरे वगैरे वगैरे...
थोड्या दिवसांनी पुन्हा दूर कुठेतरी गोष्ट घडते...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "

सासर-माहेरच्या गोष्टी