No matter what it is! Just face it, do not escape!
#pass #fail #Toppers #life #faceit #dontescape
हल्ली दहावी बारावी किंवा कसलेही निकाल लागले की लोक त्यांचे वैयक्तिक अनुभव लिहू लागलेत.
अधिकतर त्यात असं असतं की, आम्ही अपयशी झालो होतो किंवा आम्हालाही कमी टक्के होते पण आता आम्ही असे असे यशस्वी झालो आहोत वगैरे वगैरे. नापास झालो म्हणजे संपत नाही, ताण घेऊ नका वगैरे.
हे असं लिहिलं जाणं गरजेचं आहे. त्याने वाढत असेल आत्मविश्वास! मिळत असेल बळ झुजण्याचं वगैरे!!
हे नुसतं निकालाच्या बाबतीत नाही तर आयुष्यात 'सेटल' होण्याबद्दल, वय वाढण्याबद्दल, आयुष्यात काही ठरवू न शकण्याबद्दल अशा खूप काही गोष्टींमध्ये जिथे माणसांना अपयशाला तोंड द्यावं लागतं त्या प्रत्येक गोष्टीबद्दल लिहिलं जातं. याची गरज वाटून खूप share केलं जातं.

पण कोण जाणे कसं मला हल्ली हे नकोसं वाटतं. म्हणजे असा एक काळ खरंच होता जेव्हा अपयशी माणसांवर फार मानसिक अत्याचार व्हायचे. त्यामुळे हे असं सकारात्मक सांगून कोणीतरी प्रेरणा देणं गरजेचं होतं.
पण अपयश कसं चांगलं असतं, बडी बडी मंडळी कशी अपयशी होऊन खूप मोठी झाली हे आता मला मात्र नकोसं झालंय. म्हणजे आधी यशाचं कौतुक वाटत नसेल तितकी हल्ली अपयशाची कौतुकं चालतात.
सतत back बेंचर्स आणि average मुलं याची कौतुक होतात. आणि हुशार मुलांनी आयुष्यात काय मिळवलं ? आता नापसांच्या हाताखाली काम करतात वगैरे थट्टा सुरू होते.

हे म्हणजे आता अपयशी माणसांना बळ देत देत यशस्वी, हुशार माणसांना कमी लेखण्यात काय अर्थ आहे?
हुशार मुलांना काही 'स्ट्रेस' नसतो का? मला तर वाटतं, नुसतं वाटतं नाही स्वानुभव आहे की इतर कोणाही पेक्षा 'विविध पातळीवर' ताणाचा अनुभव हा हुशार मुलांना असतो. हल्ली यावर जास्त विचार व्हायला हवाय असं मला सतत वाटतं. हुशार आहे म्हणत पाल्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल तर आजच्या काळात पालकांनी हुशार मुलाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवायला हवं
वयाबद्दल, सेटल न झाल्याबद्दल ok वाटून घ्या असे लेख सतत फिरत असतात. कशाला हवंय हे असं खोटं मानसिक समाधान??? करा की face जे आहे ते.
दुःख किंवा ज्याचं वाईट वाटतं त्याला दुसऱ्यांच्या अनुभवाचं सुखी कोंदण कशाला हवं! आपण नाही करू शकलो हे मान्य करा.आपण हरलो, आपण अपयशी आहोत आपण कमी पडलो हे मान्य करायचं! याला पर्याय शोधणं चूक आहे. जळजळीत उन्हात थोडा वारा म्हणून हे लेख घ्या, पण वास्तव ऊन आहे हे मान्य करायचं त्यातून बाहेर पडण्याचा आपला आपण प्रयत्न करायचा.

उगाच हे माझ्या हाताखाली काम करतील, हा माणूस 40 व्या वर्षी सेटल झाला, वय महत्वाचं नसतं अशा अनेक गोष्टींनी अपयशाचं glorification करायची गरज नाहीय.
Strsss, depressionहे काय हल्ली हे चोचले आहेत असं मला वाटू लागलंय.
या जगात या दोन गोष्टी जगण्याचा भाग आहेत हे आता जन्मलेल्या मुलानेही समजून घ्यावं!

यशस्वी असा किंवा अपयशी काहीही असलात तरी
Life is always unfair हे विधान सगळ्यांसाठीच आहे. आणि यात कोणाचं आयुष्य किती unfair आहे याचं कोणी मोजमाप करू शकत नाही. ते जो जगतो फक्त त्यालाच कळतं! मग तुम्ही नंबर 1 वर आहात की शून्यावर आहात यामुळे काही विशेष सवलत वगैरे नाहीय.

आपला आयुष्यात एकच मंत्र आहे- No matter what it is! Just face it, do not escape!👍
Never ever Glorify your weaknesses, your conditions, family background आणि अशा अनेक गोष्टी ज्यामुळे तुमचं सांत्वन होईल. समजून घेतलं जाईल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा