विद्यापीठात जाणवलेलं एक वास्तव
हा लेख एप्रिल २०१६ मध्ये लिहिला होता ....
जे एन यु विद्यापीठात चाललेल्या गदारोळाच्या बातम्या सतत सतत गेले २ महिने नजरेखालून जातायत प्रत्येक बातमी काहीतरी नवी खळबळ माजवत आहे.
पण या बातम्या माझ्या मनात नेहमीच तुलना करत राहिल्या जे एन यु च्या या बातम्यांमधून मी जे एन यु च्या विद्यार्थी संघटना तिथली आंदोलने विद्यार्थी शिक्षक यांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांमधील जागरूकता यावर नेटवर कोणाच्या लेखांमधून जे काही मिळेल ते कुतूहलाने वाचायला सुरु केलं कारण माझ तुलनात्मक मन यासाठी मला भरीस पाडत होतं
एक student secretary, इतके विद्यार्थी, शिक्षकांची मतं ,प्रत्येक विद्यार्थ्याची काहीतरी मतं आणि आजूबाजूला काय घडतंय याचे तिथल्या प्रत्येकाच्या मनात उमटलेले भाव MUमध्ये तर बाजूच्या विभागातले विद्यार्थी कोणता कार्यक्रम करतायत तिथे काय चाललाय याची माहिती नसते!
तुम्हाला वाटेल कि अरे कसली तुलना का करतेय ही? तुलना याचं कारण आता तीन वर्ष सलग माझा मुंबई विद्यापीठाशी एक विद्यार्थी म्हणून संबंध आहे . मी मुंबई विद्यापीठ विभागीय परिषदेची विद्यार्थी सचिव होते.(२०१३-१४) आणि तेव्हा विद्यापीठाच्या वातावरणाच्या खूप जवळ गेले.तेव्हा विद्यापीठ प्रशासन, राजकारण, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांचा अनुभव हा विद्यापीठाचा एक सामान्य विद्यार्थी म्हणून येणाऱ्या अनुभवापेक्षा फारच वेगळा होता.
विद्यार्थी, चालू घडामोडी, विद्यार्थी संघटना, विद्यार्थी परिषद, विद्यार्थी सचिव,या सर्वांबाबत MU मध्ये फारच उदासीन वातावरण आहे. कोणतेही विभाग याची पुरेशी माहिती आपल्या विद्यार्थ्यांना देत नाहीत आलेली एक नोटिस बोर्डवर लावण्य़ाइतपतच याची मर्यादा आहे. मग ती जर कोणी वाचली तर ठीक आहे, नाही तर कोणी उत्सुक नाही असं म्हणत त्या विभागाचा कोणताच विद्यार्थी परिषदेत नसतो . याचे न त्या विभागाला किंवा विद्यापीठाला काही वाटत असावे म्हणून तर ५०हून जास्त विभाग असणार्या विद्यार्थी परिषदेची STRENGTH १०-१२ असावी आणि हे चूक वाटून कणी दखलही घेऊ नये.
महाविद्यालयांमध्ये जनरल सेक्रेटरी होण्यासाठीची असलेली धडपड, उत्सुकता विद्यापीठात मात्र पार बारगळून गेलेलीच दिसते . किंबहुना नाहीशी झलेली दिसते याचे कारण म्हणजे सर्वप्रथम लक्ष वेधलं जाव तर निवडणूक पद्धतीवर.
फक्त विभागातून पहिले आलेले (अभ्यासात ) असेच लोक या निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज भरू शकतात. हीच अट निरुत्साह निर्माण करण्याची मुख्य बाब आहे असं मला वाटत . कारण हे खूप क्वचित आहे की वर्गात पहिले येणारे अभ्यासू यांना समाजाशी जोडण्यात, राजकारणात, समाजकार्यात काही रुची असेल. मग जेव्हा असा विद्यार्थी अशाच सगळ्या अभ्यासू मुलांमधून निवडून येतो तेव्हा तो फक्त त्या पदावर असतो पण जबाबदारीने नसतो. त्यामुळे विद्यापीठातील सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत तर या गोष्टीचा सुगावाही नसतो कि विद्यापीठात विद्यार्थी परिषद आहे की नाही . म्हणूनच तर गेले दोन वर्ष मुंबई विद्यापीठात विद्यार्थी परिषदेची निवडणुकच झालेली नाही आणि याचे कोणालाच काही वाटत नाही न विद्यार्थ्यांना न… असो अजून कोणाला का वाटेल?!
ओपन इलेक्शन त्रासदायक म्हणून जर हा पर्याय निवडला असेल तर याने विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठीय वातावरणात जी राजकीय घडवणूक किंवा जागरूकता निर्माण व्हायला हवी ती पूर्ण बारगळून जाते प्रत्येक विभागातून एक सी आर निवडण्यासाठी गुणांच्या निकषापेक्षा मुले स्वेच्छेने उभी रहावीत. आणि विभागात मतदान होऊ द्यावं ज्यात तिथले सर्व विद्यार्थी हजर राहणे बंधनकारक असेल आणि मग त्यातून विद्यार्थी सचिव निवडला जावा हीच पद्धत योग्य वाटते (मग यात पक्षांचा सहभाग असावा कि नसावा हे मात्र विद्यापीठाने ठरवावे ).तेव्हाच प्रत्येक विद्यार्थी या प्रक्रियेशी जोडला जाऊ शकेल. नाही तर आता आहे तसेच चालू राहिलं मुंबई विद्यापीठात मुलांची राजकीयबुद्धी वाढ होण्यासाठी काहीच वातावरण नाही. हेच गेल्या तीन वर्षात मला जाणवलं . इथे असे खूप विद्यार्थी आहेत ज्यांना माहीतही नाही कि विद्यापीठात परिषद आहे!
विद्यार्थांच्या या अनभिज्ञतेमुळे आणि उदासीन वागण्याने मग निवडणुकीत शिक्षकांचेच विद्यार्थ्यात फुट पाडणारे, लुडबुड करणारे राजकारण खेळलं जात (स्वानुभवावरून). आणि मग तितकाच काय तो बोचणाऱ्या राजकारणाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो बाकी शून्य! कारण विद्यापीठात 'हवा' काय ती फक्त सिनेटसाठी निवडून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवडणुकीची आहे. पण campus मध्ये काय चाललाय याची कोणास लागली चिंता !!
जागतिकीकरण माणसाला अर्थकेन्द्री आणि माणूस म्हणून कोतं बनवतय का?! ही निबंधात वापरली जाणारी वाक्य विद्यापीठात अनुभवायला मिळतात. जे एन यु मधला एखाद्या घटनेवरील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, आंदोलने,मग त्यांच्या शिक्षकांचा सहभाग हे सर्वच त्यांचे व्यक्तिमत्व नक्कीच बदलून टाकत आहे पण याच्या अगदी उलट इथे. माझा परिवार आणि मी असं म्हणत सर्व विद्यार्थी आणि काहीवेळा शिक्षकही माझा विभाग आणि मी इतकेच मर्यादित राहतात. स्वत:च्या विषयाला सोडून इतर कुठेही वळत नाहीत. म्हणूनच तर खूप मोठे, अनुभवी वक्त्यांची व्याख्याने वेगवेगळ्या विभागान्द्वारे आयोजित केली जातात पण त्यात रिकाम्या खुर्च्याच त्या ज्ञानात रमलेल्या दिसतात.
असा एकही कार्यक्रम नाही जो इतक्या मोठ्या जागेवर वसलेल्या निरनिराळ्या भवनातील विद्यार्थ्यांना एका हेतूने एकत्रित आणेल (मात्र असा कार्यक्रम विद्यार्थी परिषद घडवून आणू शकते आणि २०१३-१४च्या परिषदेने हे शक्य करून दाखवले होते )
हीच निराशा एक कारण असावं की मुंबईतून मंत्रिमंडळात असलेले मंत्री महाराष्ट्राच्या तुलनेत फारच मोजके आहेत असा मला वाटत.
गप्पांनी रंगलेले कोपरे,चर्चांमध्ये पेटून उठलेली बाकं, कलागुण दाखवण्यात रंगलेले कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे मेळावे, विद्यार्थी जगाला एकमेकांच्या संवादात गुंतावताहेत हे चित्र विद्यापीठ म्हणून डोळ्यासमोर असेल तर त्याला एकता कपूर च्या SHOCK MUSIC प्रमाणे तीन तडे गेल्याशिवाय राहणार नाही.
म्हणूनच तर थोड्या दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात जेव्हा वाचलं की 'राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून जे एन यु सह देशाच्या विविध शिक्षण संस्थांमध्ये आणि पक्षांमध्ये सुरु असलेले वादाचे चित्र मुंबई विद्यापीठाच्या उंबरठ्यावर फारच केविलवाणे दिसून आले' तर त्यात काही नवल वाटले नाही. पण त्यातही जेव्हा एका शिक्षकाच्या निलंबनाविरुद्ध आंदोलन झाले होते तेव्हा मात्र ही जागरूकता नक्की दिसून आली होती शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही यासाठी एकत्र आले होते. एखाद दुसरा ग्रुप दिसतोही चर्चा करताना पण त्यात एकत्रितता किंवा TOGETHERNESS कमीच दिसून येतो.
येथे माझा विचार विद्यापीठातील नकारात्मकता दर्शविणे हे नसून बदल आवश्यक असलेल्या गोष्टीची अपेक्षा करणे हाच आहे. याचा दोषही कोणत्या एका बाजूला देणे चुकीचे आहे कारण इथे बदलाची भावना दोन्हीकडे असेल तरच उत्तम प्रतिसादातून बदल घडेल. सर्वांगीण घडवायचं आणि सर्वांगीण घडायचं आहे असा हेतू दोन्ही बाजूकडून असू दे.
कारण विद्यार्थ्यांची सामाजिक आणि राजकीय घडणच त्यांना अधिक संवेदनशील आणि माणूस म्हणून जागृत ठेवत असते यासाठी शिक्षणसंस्थेने नेहमीच कार्यरत असावे. कारण पंडित नेहरू म्हणतात तसं ''A University stands for humanism,For tolerance,for reason,for the adventure of Ideas and for the Search of truth'' हे आपण शिकणारे आणि शिकवणारे दोन्हींनी ध्यानात ठेवलंच पाहिजे.

-आनंदी
ashwinimane123@gmail.com
ashwinimane123@gmail.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा