राजश्री देशपांडे....
#Rajshri_Deshpande #SocialActivist #Actress#Sacredgames #SDurga
आज रुईयातल्या समभाव फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने राजश्री देशपांडेशी बोलणं झालं.
काही माणसं बोलू लागली की त्यांच्यातली तळमळ, जमिनीशी जोडून असलेलं त्यांचं जगणं जाणवत राहतं.कार्यक्रम सुरू व्हायला अवधी होता त्यामुळे तोपर्यंत गप्पा झाल्या.
तिच्या चित्रपटांमधील अभिनयाव्यतिरिक्त मला ती अजिबातच माहीत नव्हती.
ती सांगताना जाणवत गेलं की अभिनयापालिकडे असलेली राजश्री माणूस म्हणून किती संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे.
तिचं समाजकार्य, तिच्या NGO बद्दल ऐकताना तिने तिच्याच बालपणीच्या, घरच्या आठवणी सांगितल्या आणि त्यातूनच तिला हे कार्य करायला प्रेरणा मिळाली असं म्हणताना जीवनाकडे बघण्याचा तिचा सकारात्मक दृष्टिकोन भावला.

नभांगण (NGO)चे तिचे किस्से ऐकताना समाजाच्या विचारपद्धतीत बदल घडावा यासाठी असलेली तिची तळमळ स्पष्ट होत होती.
तिने दोन गावं हाती घेतली आहेत. तिथल्या बालविवाह, शिक्षणापासून वंचित असणं अशा अनिष्ट रूढींना कायद्याची जरब दाखवण्यापेक्षाही त्याचं महत्व लोकांना पटवून सकारात्मक पण पक्का बदल घडावा असा तिचा प्रयत्न आहे. एका गावात तर आता शाळाही बांधते आहे.
बोलता बोलता ती चटकन एक वाक्य म्हणून गेली आणि नेमकं तेच माझ्या मनात राहिलं.
"Rather than writing on problems of the society, I choose to working on them".कार्यक्रम सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांसमोर बोलताना तिने सांगितलंच तिच्या सेक्रेड गेम्स, सेक्सी दुर्गा अशा चित्रपटातल्या भूमिकासाठी एका साधारण मराठी घरात ज्या प्रतिक्रिया उमटाव्यात तशाच होत्या. पण मग घरापासूनच बदल घडण्यासाठी तिने केलेले प्रयत्नही सांगितले.
आपण सतत व्यक्त व्हायला हवं पण आपल्या वागण्यातून आणि कार्यातून व्यक्त होणं अधिक गरजेचं आहे.
जमिनीशी आपली नाळ जोडलेली ठेवत सजग कार्य करणाऱ्या या कौशल्यपूर्ण अभिनेत्रीला खूप खूप शुभेच्छा!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा