रोव्हर्स डेन (भटक्यांची गुहा)

सिंधू नदीच्या किनारी आणि  काराकोरम हिमालय पर्वतरांगांच्या मधोमध  वसलेले ठिकाण म्हणजे लेह लडाख .प्रत्येक पर्यटक,गिर्यारोहकांचे स्वप्न असतं की त्याने आयुष्यात एकदा तरी लेह ला भेट द्यावीच. तिथल्या प्राकृतिक सौंदर्याची मोहिनी प्रत्येकाला सतत आकृष्ठ करत असते.  उंच उंच पर्वतरांगानिरभ्र आकाशनिळेशार पाणी आणि त्याहून महत्वाचं म्हणजे चार चार पावलानंतर बदलणारा नजारा यांची भुरळ आपल्यावर पडल्यावाचून राहत नाही. सृष्टी सौंदर्याने परिपूर्ण असलेला हा भाग फिरण्यासाठी दुर्गम असला तरी तिथे जाऊन प्रेयर फ्लॅग कमावण्याचे ध्येय प्रत्येकाला खुणावत असते. म्हणूनच पर्यटक खूप काळजीने या सहलीचं नियोजन करत असतात. तुम्हीही याचं नियोजन करताय काआणि त्यातही कमी पैशात जास्त आनंद हा हेतू असेल तर तिथल्या वास्तव्यासाठी एक नवा पर्याय आता उपलब्ध झालेला आहे. 
हे शक्य केलं आहे ते महाराष्ट्रातील दोन उत्साही तरुण  कौस्तुभ दळवी आणि ग्रीष्मा सोले यांनी. गेली  सात ते आठ वर्षे ते लेह-लडाख सहली घेऊन जात आहेतलडाख सहलीचा एकूण खर्च लक्षात घेता इथे वास्तव्यासाठी खिशाला परवडणारी जागा उपलब्ध असावी असं या दोघांनाही सतत जाणवत होतं.मग हे आपणच का करू नये!! अशा विचाराने ही संकल्पना त्यांनी सत्यात आणली ती 'रोव्हर्स डेन'च्या माध्यमातून.मुख्य बाजार आणि शांती स्तूपांच्या जवळ असणाऱ्या चाळीस वर्ष जुन्या लडाखी घराचं आधुनिक आनंददायी रूप म्हणजे हे रोव्हर्स डेन हॉस्टेल. बॅगपॅकर्स आणि बायकर्स यांच्यासाठी विशेषत्वाने हे हॉस्टेल आहे.आसपास राहण्यासाठी माणशी दीड ते दोन  हजार रुपये खर्च असताना इथे अवघ्या ३५० रुपयांपासून ही व्यवस्था उपलब्ध आहे.
तुम्ही इथे प्रवेश केल्यावर मनाला आनंद देईल ते म्हणजे इथल्या वसतीगृहाचे दगडी बांधकाम,लाकडी फर्निचर,टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेतून केलेली बसण्याची व्यवस्था आणि या सर्वातून दिसणारी लडाखी संस्कृती.अनेक पर्यटकांकडून नावाजली गेलेली महत्वाचची वैशिष्ट्य म्हणजे सभागृहातील श्रीनगर -लेह ते मनाली या प्रवासाचा मार्ग दाखवणारा नकाशा आणि त्याचबरोबर व्ह्र्यांड्यात बघायला मिळणारी याच मार्गावरील पर्यटन स्थळांची चित्रे.रोव्हर्स डेन म्हणजे भटक्यांची गुहा आणि खरंच नावाप्रमाणे गोठवणाऱ्या थंडीतही घरातला उबदारपणा तुम्हाला या डेनमध्ये जाणवेल. शेकोटीच्या साथीने मधुर संगीताचा आनंद घेत,कॅरम, बुद्धिबळ यांसारखे विविध खेळ खेळत सोबत आपल्या आवडत्या थंड गरम पेयांचाही आस्वाद आपण घेऊ  शकता .डेन मधल्या या निवांत वातावरणात आपण तिथे असलेल्या मराठी , इंग्रजीतील  प्रवासमार्गदर्शनपर पुस्तकांच्या शब्द सफरीतही रमू शकता त्याचबरोबर नकाशांसोबत मानाने भ्रमंतीही करू शकता .२४ तास असलेल्या गरम पाण्याबरोबरच हल्ली पाण्याइतकीच गरजेची वाटणारी wifi सुविधाही असली तरी बाहेरच्या जगापासून दूर स्वतःचा अवकाश आपण इथे नक्कीच अनुभवू शकता . त्याचसोबत इथल्या स्वयंपाक घरात तुम्ही आणि तुमच्या  सहप्रवाश्यानी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा एकत्र बसून मनमुराद आस्वाद घेऊ शकाल . इथल्या खोल्यांचं एक वैशिष्टय म्हणजे प्रत्येक खोलीमधील  मुंबईच्या  चिन्मय तलसीलकर  आणि  ओंकार पाटील या उदयोन्मुख चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेली  लडाखी आणि हिप्पी संस्कृती सोबत  एकूणच प्रवासातील अनुभव सांगणारी चित्रे तुम्हाला तिथल्या वातावरणाशी एकरूप करतील.लेहच्या प्रवासात लागणारे विविध परवाने मिळवून देण्यासाठी रोव्हर्स डेन आपल्याला मदत करेल आणि लेहच्या पायी किंवा बाईक सफरीचा आनंद घ्यायलाही रोव्हर्स डेनची साथ मिळेल.     
मनोरंजनाच्या दुनियेपासून दूर जाऊन इथे मोकळ्या वातावरणात शांततेसाठी आलेली आनंदी माणसे एकमेकांशी जोडली जावी हेच उद्दिष्ट मनात बाळगत या दोन तरुणांचं हे रोव्हर्स डेन तुमची वाट बघत आहे. लेह च्या सौंदर्यासोबतच लडाखी संस्कृतीचं दर्शन घडवणारं आणि तेही  खिशाला परवडणारं वास्तव्य अनुभवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या या  युवा मराठी उद्योजकांना प्रोत्साहन द्यायला नक्की भेट द्या रोव्हर्स डेनला. शहरातल्या धकाधकीपासूनदूर लेहच्या थंडीसोबत डेन मधला उबदारपणा अनुभवायला कधी निघताय लडाख सहलीला ??? 

इतर उपलब्ध सोयी 
-५० लोकांची राहण्याची सोय
-मुलींसाठी वेगळी Dormitory 
-भाड्याने बाईक व सायकल उपलब्ध 
-मोफत पार्किंग 
-माफक दरात सकाळचा नाश्ता



अधिक माहिती व संपर्कासाठी : 
८६५५५३९५२५/९९७०६५७६४७  
Rovers Den (Facebook Page)
लेखन, 
-अश्विनी आनंद माने.






 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "

सासर-माहेरच्या गोष्टी