स्वभाव
आपला स्वभाव कसा होत जातो?
आपण ने हमी म्हणतो, हा माझा स्वभाव आहे मी असंच वागते किंवा मी असंच वा गतो...मी असं कधी करत नाही किंवा माझा तो स्वभावच नाहीय ..
पण या सगळ्याचं म्हणजे आपल्या या वागण्याचा आपल्याशी ठराव कधी होत असतो!?? आपण त्याबद्दल इतके ठाम कसे का य होत असतो!?
पण या सगळ्याचं म्हणजे आपल्या या
कुठून याची सुरुवात होते...
अर्थात माझ्याच वागण्यानेच मला हे प्रश्न पडतात....
तर याचा विचार करताना मला जाणवलं की स्वभाव हा लहाणपणापासून म् हणजे अगदी हलकेच काही कळायला लागल्याच्या वयापासून प्रसंग, घटनेला,वस्तूला ,व्यक्तीला आपण जो जसा प्रतिसाद देत असतो.. समा न प्रसंगांना तसाच किंवा त्यासारखाच प्रतिसाद देण्याची आपल्याला लागलेली सवय..
आणि मग ही सवय म्हणजेच आपला 'स्वभाव'.
तर याचा विचार करताना मला जाणवलं
आणि मग या काही सवयींच्या मुळाशी जाताना मला हे काही सुचलंय...
साधी गोष्ट आणि त्यासाठी आपला प्र तिसाद आणि मग आयुष्यभरासाठी आपला होणारा स्वभाव..
आपण नवीन घड्याळ घेतो ..
ही किती रोजची आणि साधीशी गोष्ट वाटते..
तर असं काही घेतो तेव्हा आपण जुन्या आणि नव् या अशा दोन्ही गोष्टींशी कसे वा गतोय ह्यातला आपला प्रतिसाद आपला स्वभाव होतो .
काहीजण नवीन घेताच वापरू लागतात आणि जुन्याला विसरतात...काही जण या स्थित्यंतरात थोडासा वेळ घेतात जुन्या नव्याची सांगड घा लतात..आणि काहीजण नवीन घेताच वा परतात पण रोज जुन्याला मात्र स् पर्शाने तरी भेटतात...
ही किती रोजची आणि साधीशी गोष्ट वाटते..
तर असं काही घेतो तेव्हा आपण जुन्या आणि नव्
काहीजण नवीन घेताच वापरू लागतात
आपलं आवडीचं पेन किंवा आणखी काही हरवतं तेव्हा...
आपण चटकन त्या चा विषय सोडून नवीन तसंच आणतो.. .वेळ नाही म्हणून आत्तापुरत दुस रं वापरतो वेळ मिळाल्यावर ते जु नं शोधतो... तर काही ते सापडल्याशिवाय श्वासच घेत नाहीत..
अशाच खूप गोष्टी जसं की आपल्या आवडीच्या वस्तू किंवा तसं च काही बिघडलं तर...कोणी आपल्याला न रुचणारी भेट दिल्यावर....नवीन घर घेतल्यानंतर जुन्या घराशी असलेलं नातं वगैरे वगैरे..
अशाच खूप गोष्टी जसं की आपल्या आवडीच्या वस्तू किंवा तसं
खूप आठवणी, खूप गोष्टी असतात
आणि त्यांना आपले अनेक प्रतिसाद असतात...
आणि त्यातून तयार झालेला आपला स्वभाव असतो..
पण मग वस्तूंच्या जागी असलेला आपला स्वभाव नकळत नात्यांमध्ये ,प्रेमामधे आणि मैत्रीमध्ये उतरत असतो...
पण मग वस्तूंच्या जागी असलेला आपला स्वभाव नकळत नात्यांमध्ये ,प्रेमामधे आणि मैत्रीमध्ये उतरत असतो...
फक्त फरक इतकाच असतो की वस्तू वैज्ञानिक दृष्ट्या निर्जीव असल्याने आपल्या वागण्याला प्रतिक्रिया,प्रतिसाद देत नाहीत.. (असं आपल्याला वाटतं) आणि जीवनात येणारी माणसं आपल्या या स्वभावाला प्रतिसाद देतात चांगला-वाईट-मध्यम कसाही...
खुपदा असं होतं की आपण आपल्या या सवयींच्या सामान्यपणे आपल्या स्वभावाच्या इतके प्रेमात असतो किंवा त्याच्याशी इतके एकरूप होतो की मग आपण त्याचे गुलाम होतो...
खुपदा कालागणिक किंवा नात्याच्या खोलीनुसार स्वभाव बदलण्यात ही गुलामी आडवी येते .. यालाच आपण सौम्य का असेना पण अहंकार (मराठीत इगो) मध्ये येतो असं म्हणून शकतोय ..गरज असेल किंवा शक्य असेल तेव्हा असे बदल अपेक्षित असावेत स्वतःकडून पण,आपण आपल्या या comfort zone च्या बाहेर जायला कचरतो आणि तेव्हाच अनेक गोष्टीमध्ये थोडा थोडा थोडा कचरा आपण साचवत असतो...
स्वभाव असावा आपण त्याला जपावं कारण तोच आपलं व्यक्तिमत्त्व जगासमोर मांडत असतो आणि आपल्या मनातही....
मी का? हा प्रश्न नसावा ना आपल्याला! कारण वैयक्तिक स्वभावाला जपण्यापेक्षा खूपदा जपलेली नाती जास्त आनंद देऊ शकतात :)
मी का? हा प्रश्न नसावा ना आपल्याला! कारण वैयक्तिक स्वभावाला जपण्यापेक्षा खूपदा जपलेली नाती जास्त आनंद देऊ शकतात :)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा