मराठी भाषा दिन [विल्सन महाविद्यालय- मराठी वाङ्मय मंडळ #शताब्दी_सोहळा_विशेष]
विल्सन महाविद्यालय मराठी वाङ्मय मंडळ आयोजित आणि #शताब्दी_सोहळा_विशेष मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्योत्स्ना प्रकाशनाचे प्रमुख श्री. विकास परांजपे सर आले होते. तेही विल्सोनियन असणं हा आनंद आणखी वेगळाच.
त्यांनी विद्यार्थ्यांना आपली 'मराठी भाषा आणि त्यातील नव्या संधी' यावर मार्गर्दर्शन केले.
भाषा अभिमान वगैरे वगैरे सगळेच शब्द बाजूला सारत त्यांनी व्याख्यानाच्या सुरवातीपासूनच ''नुसता अभिमान बाळगून भाषेचे कल्याण होत नाही'' हा मुद्दा समोर बसलेल्या प्रत्येकावर ठसवला.
आपल्या मराठी भाषेबद्दल बोलताना ते म्हणाले की आपण भाषा वापरताना ग्लोबल ऐवजी संकुचित तर होत नाही ना याकडे लक्ष द्यायलाच हवय .. मराठीत सोपे प्रतिशब्द असतानाही आपण सर्रास हिंदी आणि इंग्रजी शब्द वापरतो तेव्हा आपलीच भाषा आकुंचन पावते. एकाच शब्दाने विविध व्यापक भाव मांडण्याच्या आपल्याला लागलेल्या सवयींनवर त्यांनी टिका केली. उदाहरणादाखल ते म्हणाले सुंदर,छान ,अप्रतिम या शब्दांनी संपूर्ण प्रतिक्रिया विश्वच भरून गेलेलं आहे. उदा. कोणी गाणं गायल्यावर आपण चटकन सुंदर गायलीस असं म्हणतो पण हे खूपच चुकीचं आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. गाणं सुंदर कसं असेल!! सुरेल गायलीस असं म्हणू शकतोय ना !! किंवा खूप सुंदर बटाटा वडा ... सुंदर कसा काय !!!! चविष्ठ,तिखट, खारट असं काही आहे की नाही. हा मुद्दा मांडताना त्यांनी इंग्रजीतीलही या विशेषणांच्या आकुंचनावर लक्ष वेधले. काहीही म्हटलं की awesome,outstanding आणि अगदीच म्हणजे nice याशिवाय काही नाहीच.
चाफा बोलेना या गाण्याच्या अनुषंगाने त्यांनी त्यांचं एक निरीक्षण नोंदवलं आजकाल बहुतेक सगळ्यांनाच वाईट(च) वाटतं कोणालाच दुःख होत नाही आणि खंत त्याहूनही वाटत नाही !!
भाषेचं वैभव जाऊन चालणार नाही. हेच जपणं अपेक्षित आहे हा मुद्दा त्यांनी ठळक केला.
कोण्या अमराठी भाषकाला वाटलं की आपण मराठी शिकावं तर त्याला चटकन विकत घेता यावीत आणि भाषेचा पाया शिकवणाऱ्या पुस्तकांचा, भाषा शिकवणाऱ्या यंत्रणेचा अभाव आहे ही खंत त्यांनी मांडली. पण हे सांगतानाच विद्यापीठाच्या जर्मन विभागाकडून चालणाऱ्या 'MY मराठी' प्रकल्पाचे आणि त्यासाठी आमिर खान ने केलेल्या आर्थिक मदतीचा आनंदाने उल्लेख केला. हल्लीच शासनानेही या प्रकल्पाला आर्थिक अनुदान दिले आहे .
आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या सध्या मराठी शिकत आहेत त्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की लवकर शिकता यावी म्हणून त्या प्रवासात दिसणारे फलकही वाचतात. पण हा मुद्दा घेत परांजपे सरानी म्हटलं की आताच्या काळात फलकांवरून मराठी शिकणं याहून भयानक गोष्ट नाही. या वाक्यासाठी त्यांनी खूप उदाहरणं सांगितली . आपल्याकडे 'टनेल अहेड' चं जसच्या तसं भाषांतर आहे 'बोगदा पुढे आहे'वास्तविक सूचना देण्याच्या उद्देशाने ते 'पुढे बोगदा आहे' असे असायला हवे . प्रसार माध्यमात you can see it चे जसेच्या तस्से 'आपण पाहू शकता' असं भाषांतर वापरतात. 'आपण पाहत आहात' असं का म्हणत नसतील ??
माध्यमात चांगलं मराठी बोलणाऱ्यांचा दुष्काळच आहे असे मत त्यांनी मांडले. त्याचबरोर शासकीय पाट्यांवर दिसणाऱ्या देखरेख ऐवजी निगराणी , व्यग्र ऐवजी व्यस्त या आणि अशा इतर अनेक उदाहरणांकडे लक्ष वेधले.
या उदाहरणांना ऐकून आपण आपण हसतो खरे पण आपल्याला खंत वाटायला हवी असे म्हणत त्यांनी विषयांच्या गांभीर्याकडे अलगद सर्वाना वळवले.
भाषेतील संधी सांगताना त्यांनी e-blogs, websiteविविध अँप्सच्या दुनियेत मराठीला असणारी मागणी,अनेक शासकीय खात्यांमध्ये,अनुवादक,भाषांतरकार,दुभाषी या पदांसाठी असलेल्या रिक्त जागा,जाहिरातीमागचा आवाज, युनेस्को,wwf आदी आंतरराष्ट्रीय संस्थांना स्थानिक भाषांची लागणारी गरज अशा विविध संधी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. पण यासाठी आपण स्वतःची भाषा चांगली आत्मसात करणे खूप गरजेचे आहे हा मुद्दाही ठळक केला.
पण हे सर्व असतानाच त्यांनी म्हटले करियर वगैरे सगळं ठीक आहे पण आनंद हा आयुष्यात खूप जास्त महत्वाचा आहे. आपल्या मातृभाषेसाठी काम कारण ... भाषेतल्या या शब्दांमधून आपल्याला आनंद मिळतो. हा आनंद सतत वाढवता येईल असं काम आपण करत राहायला हवं. वाङ्मय मंडळात असणं आणि त्यात भाग घेत राहणं हा असाच एक आनंद आहे.
भाषा राडेबाजीने जपण्यापेक्षा आपण भाषेबद्दल असणारी जाणीव आणि जागृती वाढवणं गरजेचं आहे हे त्यांनी सांगितले आणि सर्वांना ते पटले यात शंकाच नाही .
व्याख्यान संपवताना त्यांनी एकच संदेश दिला ''आपली भाषा आत्मसात करा, वापरा हे अभिमानापेक्षाही जास्त महत्वाचे आहे.

खरंतर 'सिधी बात नो बकवास' हे तंत्र वापरून थेट विषयावर बोट ठेवणारे वक्ते मला जास्त आवडतात. आणि हेच काल परांजपे सरानी केलं. म्हणूनच तर भाषा मरते मरते म्हणत गळा काढत बसण्यापेक्षा थेट आपण तिच्यासाठी काय करायचंय हे सांगणारे परांजपे सर सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांचे मन जिंकून गेले.
खूप खूप धन्यवाद परांजपे सर
खूप खूप धन्यवाद परांजपे सर
मी विल्सन महाविद्यालय मराठी वाङ्मय मंडळाच्या शताब्दी विशेष सोहळ्यासाठी व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून काम करत असल्याने या सगळ्यात भाग घेऊ शकलेय याचा आनंदच आहे :)
-आनंदी_अश्विनी

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा