वाचन प्रेरणा दिन
आज १५ ऑक्टोबर ..
माझ्या आजोबांचा वाढदिवस असतो म्हणून त्या निमित्ताने गावी असताना गेल्या वर्षी मी गावातल्या शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा केला ...
यावेळी वेगळं काय करू असा विचार मनात असतानाच मला वाचनाची आवड लावलेल्या अनेकांची आठवण मनात गर्दी करू लागली. मग विचार आला यांच्यावरच लिहूया आज...
वाचन ही एक फार 'कूल' गोष्ट आहे ... मस्त फीलिंग देणारी आहे .. माझ्यात हे कुतूहल माझ्या बाबांमुळे निर्माण झालंय.. त्यांनी माझ्या या कुतूहलाच्या बीजाला ओळखून पोषक वातावरण दिलं.. ते मला आधी त्यांनी वाचलेल्या गोष्टी सांगायचे.. वाचलेले विषय शेअर करायचे त्यामुळे आपोआपच मला 'हे आपणसुद्धा वाचायला हवं 'अशी भावना निर्माण होत गेली .. आणि वाढीस लागली.
ते नेहमी त्यांच्या परदेशी मित्रांकडून पुस्तकं मागवायचे अर्थात त्या कादंबऱ्या नव्हत्या ती त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाची होती.पण मला अजूनही हे अस परदेशातून पुस्तक मागवण यात एकदम 'हवा' वाटते. असो मीही मागवेन वाचनाचा व्यासंग वाढल्यावर :P
बाबांचं नेहमीचं सांगणं असायचं : तुझा वेळ दुसऱ्यांनी लिहिलेला वाचण्यात घालवलास तर दुसऱ्यांची दुःख स्वतः न सोसताही समजायला लागशील. आणि ''The more that you read,the more things you will know.The more that you learn,The more places you'll go.''
तेव्हा सर्वप्रथम माझे वाचन प्रेरणा आहेत माझे बाबा..
नंतर आहेत माझे दोन भाऊ.. त्यांना स्वतःला इतकी वाचनांची आवड नाहीच पण तरी माझ्यासाठी आणतात ते पुस्तक कुठूनही.. अगदी कुठूनही..आणि लहानपणी मला नवनविन युक्त्या शिकवायचे स्वस्त मस्त पुस्तक कशी कुठे घायची. रद्दीतून पुस्तकं कमी पैशात घेऊन पुन्हा वाचून नवनवीन घेणं हे मला त्यांनी शिकवलेलं :D
(अर्थात आता मला याबद्दल जास्त माहितीय :P )
पुस्तकांच्या विपुल साम्राज्यात हरवून जाण्याचा कसब मला माझ्या काकांनी शिकवलं.. ग्रंथालय किंवा बुक डेपो, पुस्तकांची दुकानं ही ठिकाणं तुझा वेळ मस्त घालवू शकतात हे त्यांनी माझ्यात रुजवलं (मला वाटतं तेव्हापासूनच माझी 'वेळ आहे तर थोडं शॉपिंग करत फिरुया'' याबद्दल अनास्था निर्माण झाली ) काकांमुळे शॉपिंग हा शब्द मला पुस्तकांची खरेदी या आनंदात डुबवतो. एक वेळ जेवण चुकलं तरी चालेल पण कितीही व्यस्त असलो तरी वाचन चुकता काम नये हा संदेश मला काकांच्या वागण्यातून मिळतो.
आणि अर्थात या शॉपिंग ला कधीही विरोध न करणारी आई. कधी कधी करते कारण ''अजून आहेत ती वाचून झाली नाहीयेत तर दुसरी का आणलीयत'' पण ठीक आहे इतकंच बोलते आणि मी ते न ऐकल्यासारख करते. पण तीच एखाद नवीन पुस्तक आल की आधी मला सांगते .. :D :D
शाळा आणि कॉलेजातल्या शिक्षकांची मला 'नक्की काय आणि कस वाचावं' याची जडण घडण होण्यास फार मदत झाली. आणि या बाबतीत मी फारच नशीबवान आहे की,काही वाचलेल शेअर करणारे.. पुस्तकं रेफर करणारे.. मला त्यांच्याजवळची पुस्तक वाचायला देणारे आणि या पुस्तकांवर चर्चा करणारे शिक्षक मला भेटले.
मला असेच मित्र मैत्रीणीही भेटतात ही आयुष्याची हॅपी फीलिंग आहे. 'Today a Reader Tomorrow a Leader' हे शाळेत ऐकलेलं वाक्य मनावर ठसवून घेतलय.
एम ए ला गेल्यावर प्राध्यापकांमुळे एक सवय लागली की पुस्तक त्याच्या पहिल्या पानापासून नाही तर 'मुखपृष्ठ ते मलपृष्ठ' असं वाचायला हवं.. ,'Reading is food for your soul'
आणि एक गोष्ट तर नेहमीच लक्षात राहावी अशी आहे..
''Reading- that place where you are by Yourself but you are NEVER ALONE''
त्यामुळे प्रवासात असो व कुठेही एकट असणं माझ्यासाठी कधीच बोर असणं नसतं.
जसजसं वाचन कणभर क्षणभर वाढतंय तसतसं 'वाचन नुसतच वाचन नको तर पचनी पडावं जगण्यात यावं ' असा प्रयत्न आहे. या बाबतीत मला खूप श्रीमंत व्हायचंय अधिकाधिक समृद्ध व्हायचंय.
And yes without forget 'Reading is For AWESOME PEOPLE'' and I know I am awesome ;) ;)
so are you reading?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा