पत्रलेखन...

पत्रलेखन... 
आपल्याला कुणाचं तरी पत्र येणं ,आपण कुणाला तरी पत्र लिहिणं आणि स्वतः ते पाठवणं या गोष्टी अगदी जादुई असतात. खरंच पत्र आपल्या हातात मिळणं किंवा आपल्या हातातून आपल्या माणसाला जाणं हा क्षण म्हणजे आनंदाने ओतप्रोत असतो. 'कदाचित' ही भावना मेल मधून किंवा मेसेज मधून येणाऱ्या पत्रातून नाही समजणार.. पत्र लिहिणं म्हणजे लिहायला घेतो तेव्हाच लिहीण असं नसतं तर जेव्हा मनाच्या किनाऱ्यावर ही पत्र लिहिण्याची उर्मी आदळते तेव्हाच ती पत्रातल्या आठवणींचा ओलावा सोडून जाते.. मग मनात विचारांचे, भावनांचे, आठवणींचे चक्र चालू होते हळूहळू या सगळ्याला थंडावा मिळतो आणि मग भरून आलेले हे नभ पत्रात पेनातून बरसत जातात.. किंवा किबोर्डच्या बटणांतून...
पण मला स्वतःला हस्तलिखित पत्र वाचायला जास्त आवडतं.. बदलत्या भावनांनुसार बदललेलं अक्षराचं वळण मनाला सुखावतं.
कुणाचही पत्र आपल्याला येणं ही फार मोठी गोष्ट;असते किंबहुना माझ्यासाठी आहेच! इतक्या तंत्रज्ञानाने भरभरून वाहिलेल्या जगात कुणीतरी आपल्यासाठी 'खास' वेळ काढतंय आणि स्वतःच्या हाताने पत्र लिहितंय यापेक्षा अजून काय ती भावना असेल "फीलिंग स्पेशल''!!!!!! मग त्या पत्रातून मला अगदी शिव्या जरी दिल्या असतील तरी मला आनंदीच वाटेल(सुरुवातीला वाचतानाच). कारण रागासाठी आणि माझ्यासाठी त्या व्यक्तीने वेळ काढलाय हे महत्वाचं.....
असो ही  मजेची गोष्ट, पण ही येणारी पत्र म्हणजे भावनांचा कल्लोळ असतो.. कधी  डोळ्यातून अलगद अश्रू ओघळतात, तर कधी हास्यकल्लोळ करून टाकतात, कधी त्या वाचण्याच्या वेळात अगदी भूतकाळ पुन्हा जगायला लावतात, तर काही भविष्याची स्वप्न उज्वल करतात. पत्र आणलेल्या पोस्टमन काकांनी सही घेऊन द्यायच्या आधीच नाव वाचण्याची उत्सुकता असते.. आणि तितक्या क्षण दोन क्षणातच आपण त्या व्यक्तीला हजारदा भेटून आलेलो असतो .
मला एक आनंद आहे, की माझ्या अगदी लहानात लहान म्हणजे अगदी तिसरी चौथीतील माझे मित्र मैत्रीण,माझ्या वयाचे मित्र मैत्रीण, आई बाबांकडून, काका, आजोबा एकूणच सर्व वयोगटातील माझ्या माणसांनी मला पत्र लिहिली आहेत. 'फीलिंग ब्लेस्ड' आहे इकडे मी.
बरं कधी जेव्हा अगदीच असं वाटतं  की ''आज मैं उपर आसमा नीचे'' किंवा ''टुटे ख्वाब सारे एक मायूसी है छायी'' मग लगेच आपल्याला आलेली ही आपल्या मंडळींची पत्र वाचावीत कसं  झटक्यात जमिनीवर आणतात आणि झटक्यात नवी उमेदही देतात.
मला पत्र  लिहिण्याची खूप जास्त आवड आहे.. सरसकट सगळ्यांना पत्र लिहिते.. सगळ्यांना म्हणजे मित्र-मैत्रिणी, मला आवडणारे लेखक, व्यक्तिमत्व, नेतेमंडळी, एखाद्या कार्यक्रमाला गेलो की तिथले चांगले बोललेले वक्ते.. खूप प्रेरणादायी  वाटलेल्या व्यक्ती, आवडता अभिनेता,शिक्षक, आई, बाबा, भाऊ, बहिणी , उगाच आवडलेला मुलगा, खूप मस्त वाटलेले लोक, ढगात गेलेले आपले पूर्वज, स्वातंत्र्यवीर, क्रन्तिकारक,घरातले पाळीव प्राणी (माझी मांजर 'राधा') आणि अगदीच न आवडलेल्या माणसांनाही....  असे एकूणच सगळेच्या सगळे... वाटतं तेव्हा लगेच लिहिते पण पाठवते यातल्या अगदी १-२ % माणसांनाच....
मग उरलेली पत्र हळूहळू कुठेतरी हरवत जातात... आणि मग एकही हातात उरलेलं नसतं... पण माझा हा एकतर्फी पत्रप्रपंच नेहमीच चालू असतो. बरं वाटतं लिहून... म्हणून पत्र लिहीत राहिलं पाहिजे.. माझी एक ईच्छा म्हणजे छोटं ध्येयच आहे प्रत्येक व्यक्तीवर असलेल माझं प्रेम मी एकदातरी पत्रातून मांडून त्याच्यासमोर ठेवावं. आणि हे ध्येय पूर्ण करताना मलाच खूप जास्त आनंद होणार आहे.. कारण पत्र आणि माणसं हे दोन्ही माझ्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.
आणि माझं पत्र वाचण म्हणजे 'कदाचित' लोकांना त्रासच असेल ते कधीच short and sweet नसतं.. but it is always long and tasty :P :) तसा  मी प्रयत्न करते कधी कधी लहानसं पत्र लिहिण्याचा पण अजून नाही जमत..
मला एक छान  वाटतं  की Mark Twain माझ्या सोबतीला आहे. :) :D
-आनंदी :D


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "

सासर-माहेरच्या गोष्टी