सांज

सांज 



उगवत्या संध्येची एक मजा आहे 
खूप आठवणींचा वसा तिच्याकडे आहे 
drafts मध्ये बुडालेल्या भावनांना 
पुन्हा तीच घेऊन येते क्षितिजावर 
रमवून ठेवते कॉफीच्या प्रत्येक घोटात
एकेका नवीन आठवणींची चव देत  
नात्यांची अनेक गुपिते मनात साठवलेली 
उतरतात तिच्याच समोर 
कधी डोळ्यातून  
कधी शब्दातून 
कधी एका  मिठीतून 
उगवत्या दिनकरासोबत राबते शरीर
आणि 
या उगवत्या संध्येत राबते अखंड मन 
ही उगवती संध्याच जन्म देते सृजनाला 
अभिसारिकेच्या भावनांना 
युगुलांच्या प्रेमाला  
लिहिणाऱ्यांच्या  शब्दांना 
आणि मोकळीक देते मनाच्या 
अनेक बंद कप्प्यांना 
मग उदयशील संध्येला का म्हणा उगाच 'सूर्यास्त'!
-आनंदी :D 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "

सासर-माहेरच्या गोष्टी