एक कविता मैत्रीची…
एक कविता मैत्रीची…
(दीप्तीच्या वाढदिवसाला सुचली म्हणून तिच्याचसाठी tongue emoticon smile emoticon smile emoticon Dipti )
18th August 2015
मैत्री आहे अनेक भावभावनांनी भारलेली
मैत्री आहे आस्वाद घेत एकत्र जेवण्याची
मैत्री आहे चहाच्या कपात भरून पावलेली
मैत्री आहे मिसळसारखी एकदम झणझणीत लागणारी
मैत्री आहे पार्टनर इन क्राइम बनण्याची
मैत्री आहे नाईट आउट मधल्या शेरिंग ऑफ हार्टची
मैत्री आहे अखंड गप्पांत रमलेली
मैत्री आहे भेदून टाकणाऱ्या हास्यकाल्लोळाची
मैत्री आहे नव्या ओळखीत गप्प राहण्याची
मैत्री आहे Mutual Friendsना सामावून घेण्याची
मैत्री आहे कशावरही जोक करून हसण्याची
मैत्री आहे तोंडावरच सगळ बोलून टाकण्याची
मैत्री आहे अनेक विनोदी भांडणांची
मैत्री आहे उगाच एकमेकांना दोष देत हळूच आपली चूक मानण्याची
मैत्री आहे भांडणानंतर पुन्हा वाढलेल्या प्रेमाची
मैत्री आहे स्वभाव जाणून वागण्याची
मैत्री आहे एकमेकांना सगळ्यांसकट समजून घेण्याची
मैत्री आहे उत्स्फूर्त, दाटून आलेल्या सर्व भावनांच्या प्रकटीकरणाची
मैत्री आहे त्याच भावना अलगद सांभाळण्याची
मैत्री आहे एकमेकांना बिलगण्याची
मैत्री आहे प्रत्येक भेटीत नित्यनुतन वाटणारी
मैत्री आहे प्रत्येक प्रसंगात अनुभवलेली
मैत्री आहे एकातच सगळी नाती बांधणारी
मैत्री आहे घट्ट झालेल्या अनुबंधांची
मैत्री आहे स्वतःला सुंदर करणारी आणि
इतरांनाही सुंदर बनवणारी…

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा