" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "
" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "
जी गोष्ट मुळात खरी नसतानाही तिच्यावर विश्वास ठवणे, ती मानणे म्हणजे 'अंधश्रध्दा' ,अंधश्रध्दा केवळ अज्ञान नाही तर ती प्रक्रिया आहे.म्हणूनच देवा-ध्रर्माशी तिचं नातं एवढं सरळ आणि सोपं नाही.अमूक- अमूक सांगतो, म्हणून ते खरंच असलं पाहिजे.चिकित्सा करण्याची गरज नाही 'शब्दप्रांमाण्य' आणि 'अचिकित्सा' हे अंधश्रध्दा प्रक्रीयेचे दोन प्रधान घटक आहेत.
अंधश्रध्दा हा एक मानसिक दुबळेपणा आहे. मागास व अशिक्षित समाजाचे हे एक
वैगुण्य आहे. श्रध्दा आणि अंधश्रध्दा याबद्दलचा वाद तर कायमच चालू असतो.
देवधर्मकल्पनेशी त्याची फार सांगड असते.
अंधश्रध्देची अनेक उदाहरणे आहेत काही सौम्य तर काही घातक व भयंकर आहेत.
·
मांजर आडवे जाण्यामुळे काम बिघडते, तीन तिगडा काम बिगडा.
·
मासिक पाळी अमंगळ असते, विटाळ होतो.
·
पायाळू जन्म झालेली व्यक्ती जमिनीतले पाणी ओळखू शकते.
·
अंगारेधुपारे व बुवाबाजीमुळे पुत्रप्राप्ती होते.
·
कोवळया मुलींशी संभोग केल्याने लिंगसांसर्गिक आजार
बरे होतात.
·
वेड लागल्यावर मारझोड करणे, भूत घालवणे.
·
अंगात येण्यावर मंत्रतंत्र,
·
लिंबू मारल्यावर मरण येणे.
·
गणपती दूध पितो. मारुतीच्या मूर्तीला घाम येतो.
·
बालकबळी दिल्यावर गुप्तधन सापडते.
करणी ,अंगात येणे,, देवाला कौल लावणे,, विधवा स्त्रियांबद्दलच्या अंधश्रद्धा,, पाप आणि पुंण्याबद्दल च्या संकल्पना
हे आणि 'नियती' हा विषय प्रत्यक्षात अंधश्रद्धेचा बालेकील्ला आहे. आपल्याकडे मुंगुसाचे
दर्शन झाल्यास 'मिष्टाण्ण भोजण' मिळेल असे मान्यता आहे, तर राजस्थानात मुंगसाचे दर्षण अशूभ शगुण मानला जातो. शेतात जाताणा भाकरीबरोबर काही तेलकट असेल तर हमखास कोळस्याचा खडा भाकरीबरोबर बांधूण दिला जातो. अन्यथा भूतबाघा होन्याची शक्यता असते. घराबाहेर पडताणा उजवाच पाय प्रथम टाकावा अशी मान्यता आढळते. उंबऱ्यात पाल चुकचूकली तर
पाणी टाकावे अशी धारणा आहे.अशा रुढी परंपरा आपण का पाळतो? त्याच्यापाठीमागील भूमिका काय असावी? त्या प्रथमता: का सुरु झाल्या असाव्यात? त्यांचा प्रसार इतक्या प्रभावीपने पिढीदरपिढी पूढे चालत कसा आला असेल?
कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.निवडणूक- प्रचाराचे नारळ तुळजाभवानीपुढे फुटतात,,,,,,,, ,,, दर्ग्यावर चादर चढते,, देवळावर कळस चढतात. तान्ही पोरे दुधावाचून तडफडत असली तरी दगडी पुतळ्यावर शेकडो दुधाच्या घागरी उपड्या होतात.उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे.
देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही. ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहूया म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो आहे. वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते.‘Justice
is simply the interest of the Stronger’.
उदी,,भस्म,, ,अंगारे ,धुपारे ,गंडे ,दोरे,वगैरे प्रकार व नरबळी ,पशुबळी अशा निंद्य पद्धती समाजात रूढ होऊन बसलेल्या आहेत.याचे कारण झटपट फळ मिळण्याची आशा हे होय.अज्ञानाच्या प्रभावामुळे समाजातील अनेक अज्ञानी लोक भयगंडाच्या आहारी जातात. भूत-पिशाच्च बाधा,, देवाचा किंवा देवतेचा कोप,, मूळ पुरुषाचा रोष वगैरे वगैरे काल्पनिक भयगंडाच्या आहारी ही अज्ञानी, अडाणी व अन्धश्रद्धावान मंडळी जात असतात.अनेकदा माणसाच्या ठिकाणी भयगंड निर्माण झाला की, त्याचे जबरदस्त परिणाम त्याच्या मेंदूवर होऊन माणसाला भलते सलते आभास होऊ लागतात. एखाद्या माणसाने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घ्यावा, त्याचप्रमाणे भयगंडाच्या अधीन झालेले हे अंधश्रद्धावान लोक स्वतःच स्वतःचा नाश करून घेतात. "चमत्कार तेथे नमस्कार".चमत्कार म्हणजे दाखवणाऱ्याचे ज्ञान आणि बघणाऱ्याचे अज्ञान.
वरच्या स्तरातील लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात,हे पाहिल्यावर अशिक्षित व अडाणी
लोकांनी त्यांचे अनुकरण केले नाही तरच नवल. अशिक्षित अडाणी लोक मुळातच
अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले असतात. समाजातील वरच्या स्तरातील तथाकथित मोठे लोक
जेव्हा अंधश्रद्धेला पोषक अशा गोष्टी करू लागतात तेव्हा समाजातील अशिक्षित अडाणी
लोक अधिकच बिघडू लागतात.तात्पर्य शाळा कॉलेजातून मिळणारे शिक्षण अंधश्रद्धेशी
मुकाबला करण्यासाठी समर्थ ठरत नाही.
अंधश्रद्धा हा मानवी जीवनाला मिळालेला फार मोठा शाप आहे. हा शाप म्हणजे मूर्तिमंत विषारी साप आहे.एकवेळेस साप बारा पण हा अंधश्रद्धेचा शाप अंत्यंत घातक आहे. साप माणसाला एकदाच चावेल आणि मारेल पण अंधश्रद्धेचा शाप मात्र मानवी जीवन युगानुयुगे विषमय करून माणसाला दुख्खाने भाजून काढीत आहे. सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर दारिद्र्य ,भयगंड आणि लोभ या तिघानाही मुळ कारण अज्ञान हेच असते. म्हणुन अज्ञानाचा महाराक्षस नाश पावल्याशिवाय मानवी जीवन सुख शांतीने बहरणार नाही. अज्ञान नष्ट करण्यासाठी लोकांना ज्ञान मिळवण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे . शाळा--कॉलेजातून जे शिक्षण दिले जाते, ते शिक्षण केवळ पोट भरण्यासाठी उपयुक्त असते. या शिक्षणातून माणसाला खरे ज्ञान मिळत नसते. म्हणूनच अंधश्रद्धेचे भूत जसे अशिक्षित लोकांच्या मानगुटीवर बसलेले आहे, त्याचप्रमाणे ते सुशिक्षित लोकांच्या मानगुटीवर सुद्धा बसलेले आहे.
माणूस हा विचार करणारा प्राणी आहे असे सांगितले जाते. परन्तु प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र अगदी उलट आहे. समाजातील बहुसंख्य लोकांना विचार करण्याची कुवतच नसते या जगातील पशु नुसतेच जगत असतात व नुसत्या जगण्यापलीकडे काही तरी विशेष आहे ह्याची किंचितही जाणीव त्यांच्याकडे नसते हे चार पायांचे पशू जगात असे वावरत असतात त्याचप्रमाणे दोन पायांचे पशुसुद्धा जगात नांदत असतात. हे दोन पायांचे पशु म्हणजे माणसे. नुसते जगात असतात व नुसत्या जगण्यापलीकडे त्यांची दृष्टी कधीच जात नाही. चार पायांचे पशु कुठल्याही प्रकारे विचार करण्यास असमर्थ असतात. अगदी त्याच प्रमाणे हे दोन पायांचे पशु विचार करण्यास असमर्थ असल्याचे आढळून येतात. अंधश्रद्धेचे खच्चीकरण करीत असताना श्रद्धेला धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यातसुद्धा शहाणपण आहे. अंधश्रद्धा जितकी त्याज्य आहे तितकी श्रद्धा ग्राह्य आहे.
"वाचन, श्रवण व चिंतन" हे ज्ञानाचे दरवाजे होत. जी माणसे हे ज्ञानाचे दरवाजे स्वतःहून स्वतःसाठी बंद करून घेतात, ती माणसे ही माणसे नसुन दोन पायांचे पशू होत. हे दोन पायांचे पशुच सामाजिक जीवनात अनेक समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. दुर्दैवाने ह्या महत्वाच्या मुद्द्याकडे शैक्षणिक संस्था,, समाज सुधारक, ,राजकीय पुढारी व धर्ममार्तंड या सर्वांचेच भयानक दुर्लक्ष झलेले दिसून येते. त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा कितीही उदो उदो केला तरी ह्या मूळ समस्येवर लक्ष गेलेले दिसत नाही. हे ध्यानात ठेवणे आवशयक आहे. जगातील सर्व मानवी समस्यांचे मुळ नेमके तेथेच असून या संदर्भात प्रभावी उपाय योजना केल्याशिवाय, मानवी जीवनातील कुठल्याही समस्या सुटणार नाहीत.
उत्कर्ष व उन्नती ह्यांच्या आड येणाऱ्या ह्या अंधश्रद्धेला नष्ट करण्याचा उपाय एकाच आहे तो म्हणजे ज्ञान- होय. 'शहाणपण' जेथून उदयाला येते ते ज्ञान होय. wisdom
is the surest solution to all sorts of problems in the world right from A to Z.

Nice
उत्तर द्याहटवाBarobar ahe
उत्तर द्याहटवाखुप छान लेख
उत्तर द्याहटवाMala ek vicharayacha aahe ki chapati zhala var gas var tava rahila tar kai hota aani & jayani banvala tyani Ka kadhala pahije
उत्तर द्याहटवाMala ek vicharayacha aahe ki chapati zhala var gas var tava rahila tar kai hota aani & jayani banvala tyani Ka kadhala pahije
उत्तर द्याहटवाBahut acha lekh likha aapne. pr mera ek swal hain aapke lek main sitf hindu samaj ko hi target kiya hain ya fir Aapki samiti sirf aur jada hindu ke kilaf hi awaz aur jadutona batati baki dharmo me b bahut andhshradha hai vaha pe jakr kabi b nahi kahti ki ye jadutona band
उत्तर द्याहटवा