पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सासर-माहेरच्या गोष्टी

इमेज
  Shared with Public लग्न होऊन आताशे चार महिने होतील... तरी अजून या आयुष्यात स्थिर व्हायला नेमका किती वेळ लागेल असा प्रश्न मनात नेहमीच असतो. लग्न काही अचानक झालंय असं नाही. स्थळं बघायला सुरुवात केल्यापासूनच खरंतर मनाची हळूहळू या आयुष्यासाठीची तयारी होत असते. पण कितीही तयारी करा.. जेव्हा नेमकं आपलं घर जे नंतर अचानक माहेर म्हणून संबोधलं जातं ते सोडून दुसऱ्या घरी, सासरी राहायला लागतो तेव्हा अगदीच कसोटीचा काळ होऊन जातो. नेमकं कुठेच रमता येत नाही. माझं घर म्हणून घट्ट जपलेला भाव अचानक माहेर होतं.. आणि लग्न होऊन सासरचे घर आपलं करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे हक्काने हे माझं घर असं म्हणताना मन कुठेच स्थिरावलेलं नसतं. लग्न झाल्यानंतर 10 एक दिवसांनी गुगलमॅप मध्ये होम च्या जागी लोकेशन बदलताना अचानक एक मोठा श्वास घेतला जातो. सासर वाईट असो वा चांगलं याचा संबंध इथे नाही. सासरी राहताना काही केल्या माहेरची आठवण क्षणभर जात नाही. मृगजळा प्रमाणे माहेरची दृश्य डोळ्यासमोर उभी राहतात. त्यात आपण रमणार इतक्यात हे शक्य नाही असं आपणच आपल्याला समजावत राहतो. एखाद्या प्रसंगाच्या संदर्भाने माहेरची...

आत्तू -भाच्चू

  आत्तूचं लग्न आणि भाच्चूचं चिंतन - काय रे आजकाल आत्या दिसत नाही इकडे तुझी? हो, तिचं लग्न झालंय. अच्छा सासरी गेलीय तर! नाही तसं काही नाही! लग्न झालंय. लांब कुठे गेली नाहीय. तिचा मित्र आहे ना त्याच्या घरी राहायला गेलीय. तिला आवडतंय त्यांच्याकडे राहायला म्हणून तिकडे राहतेय. बाकी काही नाही. ती येणारे परत. लग्न म्हणजे काय रे? आपल्याला कोणी आवडलं ना की लग्न करायचं. मग आपण त्यांच्या घरी राहायला जायचं. अथर्व मला तुझी आठवण येते रे तिकडे खूप... अगं मग सारखी ये-जा कशाला करतेस! ये परत इकडे राहायला. आत्या, आता तू आली आहेस ना इकडे? हो लगेच जाणार आहेस? नाही, आहे मी. आता अजिबात जाऊ नको. त्या गुरुप्रसाद मामांसोबत नाही आलीस हे खूप बरं झालं! आता त्याला आपण घरी घेऊयाच नको. मग तो तुला नेऊच शकणार नाही. आत्या.... आता बास झालं गं.. तिकडे नको राहूस आता! घरी कधी कोणी ओरडलं की भाच्चू लगेच सांगतो... मी आता इकडे राहणारच नाही. मी जातो आत्याकडे राहायला... आताशा भाच्चू काळाचं विभाजन असं करतो... आत्या तू इकडे रोज राहत होतीस ना तेव्हा आणि तू तिकडे राहतेस तेव्हा... भाच्चूला प्रश्न पडला... आता आत्या आली की तिला काचे...