पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपली मातृभाषा

इमेज
कोणत्याही भाषेमध्ये किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपली मातृभाषा असल्याने आपण कधी त्याचा विचारही केलेला नसतो. आपल्याला ते सहज अवगत होतं आणि भाषेचं हे रूप आपण वापरतोय याची आपल्याला अजिबात कल्पनाही नसते. इतर भाषकांना मराठी शिकवताना कधी कधी माझ्यासोबत विद्यार्थ्यांनाही जाणवतं की अरे हिंदीतही असं आहे किंवा आमच्या भाषेत हा नियम आहे आणि आम्हाला तो सहज जमला वगैरे.. मध्यंतरी एका दिल्लीतील माणसाला मराठी शिकवत होते... नेमकं ही शिकवणी चालू असताना माझा भाचाही बोलायला शिकत होतं... त्यामुळे भाषा शिकवणं आणि मातृभाषा आत्मसात करणं या दोन्ही प्रक्रिया मी अनुभवत होते. आणि मला आकळत गेलं की आपलं आपल्या मातृभाषेवर कसं प्रेम जडतं. म्हणजे किती छोट्या गोष्टी - *कर्त्याला प्रत्यय लावणं - मला, त्यांना *शब्दांचे समान्यरुप होणं - पुस्तक - पुस्तकां-ना *काळानुसार क्रियापद- जातो, गेलो *कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापदात होणारा बदल -ती करते, तो करतो *वचनानुसार क्रियापद - मी करेन, ते करतील आता हे वाचतानाही जाणवेल की अरे हे तर शाळेत जायच्याही आधी आपण शिकलोय... पण हेच अन्य भाषकाला शिकवताना त्यात रुजवताना किती काय सर्जनश...

सहज आनंद व्यक्त करणं ही पहिली पायरी...

फार सोप्प असतं आनंदी राहण! पण आनंदी राहायला आपल्याला मोकळेपणाने वावरता यायला हवं! निखळ जगता यायला हवंय! आणि तेच जास्त कठीण असतं! आपण प्रत्यक ठिकाणी मणामणाची ओझी वाहून जगतो! नको तिथे शिष्टाचारांचं ओझं! समोरचा काय विचार करेल याचं ओझं! पत सांभाळण्याच ओझं! आपल्याला अगदीच साधं तर consider करणार नाहीत ना याचं ओझं! आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत हे स्टेट्स जपण्याचं ओझं! आणि एरवी जबाबदाऱ्या, नोकरी, घर, संसार, अडचणी , रोजच्या समस्या या सगळ्याची कायमस्वरूपी ओझी आपण वाहतच असतो. आणि या सगळ्या मोठ्या ताण-तणावात छोट्या छोट्या गोष्टींवर व्यक्त होणंच राहून जातं. हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो पण अमलात आणणं राहून जातंय हे मात्र आपण विसरतो. व्यक्त होताना आपण किती जास्त विचार करतो इतका तर कोणावर टीका करताना कोणाविषयी गॉसीप करतानाही करत नाही. फार छोट्या गोष्टी असतात... कोणाचं शर्ट छान वाटलं, कपडे सुंदर वाटले, कोण सुंदर दिसत असेल तर आपण अनेकदा सांगतच नाही. अर्थात आजकाल दिसण्यावरून काही म्हणणं म्हणजे भीती वाटते! पण विश्वासातल्या माणसांना आपण सहज सांगावं की! खास करून आपल्या घरातली माणस आपली मित्र मंडळी, कामा...

कसं व्यक्त होतो हेही महत्त्वाचं!

काही दिवसापासून चाललेला  # tiktok  वाद आणि हल्ली काही दृष्टीस पडलेली memes पाहून बराच वेळ मनाशी चाललेली चर्चा इथे लिहिते... सलमानचा तो किस्सा आठवतोय का कुठल्यातरी चित्रपटात आपल्या भूमिकेसाठी त्याने इतकी मेहनत घेतली होती की त्यासाठी माझ्यावर बलात्कार झाल्यासारखं वाटलं अशी काही उपमा वापरली होती... अर्थात त्याला हे शब्दशः म्हणायचं नव्हतं! असं तो म्हणालाही, त्याने माफीही मागितली. टिक टॉकविषयी बोलताना  # Carryminaty  आणि त्याला पाठींबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने तिथल्या मुलांना छक्का,  मुली, बेटी ही संबोधनं वापरली. लाखो लोकांनी याच शब्दांसह हे शेअर केलं कोणालाच यात गैर वाटलं नाही. एखाद्या मुलाचं किंचितसं वागणं आपल्याला मुलीसारखं जाणवलं की आपण लगेच त्यांना लेबल्स लावतो. आता ही विशेषणं काय असतात हे वेगळ्याने मी सांगायला नको!!! कुठेही काहीही होवो आपण आपला राग व्यक्त करण्यासाठी, आपण स्वतःला सो called विनोदी समजतो किंवा फारच Sence of humour असल्याचं समजतो तेव्हा आपण त्या त्या व्यक्तीच्या लिंग, Sexuality, शरीरावर विनोद करतो,टीका करतो. (आपल्या शिव्यांविषयी काही बोलायला नको...