वेगवान जग...
मुंबई कधी थांबत नाही! काल बॉम्बहल्ला, गोळीबार काहीही झालं असेल आज ती पुन्हा नव्या जोमाने दिवसाची सुरुवात करते. मुंबईकर कधी थांबत नाही! खरंतर मुंबईच्या रिमोट मध्ये स्टॉप बटण नाहीय! काय आहे ना सुरुवातीची वाक्य आधी काही वर्षापूर्वी वाचली की जरा अभिमान वगैरे वाटायचा! नंतर जरा जरा कळू लागलं तर जाणवलं की मुंबई का थांबत नाही... मग यामागची आर्थिक,सामाजिक सर्वच कारणं कळू लागली. इथे माणसांमधलं Survival Instinct भरभरून वाढतच चाललंय! आता हल्ली याची चिंताच वाटते... बेस्ट बसच्या संपाला आता सात दिवस वगैरे होतायत. एव्हाना माणसांना बसची उणीव जरी जाणवत असली तरी तिला आलेल्या पर्यायी व्यवस्थेवर कधीही माणसं स्थिरावली जातील याचा मला विश्वास वाटतो. पर्यायी व्यवस्थांमध्ये बसल्यावर,रिकामटेकड्या वेळेत, बस पेक्षा जास्त पैसे द्यावे लागले की ऐकू येतात त्या संपावर ताशेरे ओढणाऱ्या चर्चा!पण फक्त तेव्हाच! इथे बातम्यांमध्ये 'अजूनही संप चालूच' असं वाचताना/ ऐकताना हे रोजचं दृश्य बघून न पाहिलेल्या पण अभ्यासात असलेल्या मिल संपाच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. अर्थात असं अजिबात होऊ नये. वेळीच संपाबद्दल योग्य निर्ण...