पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ये जो गुड गर्ल या बॅड गर्ल ये जो इमेज बनाया हुआ है ना ये सब एकदम बकवास है!!

इमेज
            ये जो गुड गर्ल या  बॅड गर्ल ये जो इमेज बनाया हुआ है ना ये सब एकदम बकवास है!!  बात सिर्फ इतनीसी हैं की आप अपनी जिंदगी को किस तरिके से जिना चाहते हैं....  वेळ असला की शॉर्ट फिल्म्स आणि वेब सिरीज बघणं हा माझा नवा छंद आहे. अर्थात यामागे माझा स्वभाव आणि  फायदाही तितकाच आहे कारण सलग ३ तास देण्यापेक्षा दिवसाआड २० -२५ मिनिटे देण मला परवडतं.  कारण एखादा चित्रपट कधी कधी ३ तासात जे नीट सांगू शकत नाही ते खूपदा एखादी शॉर्ट फिल्म किंवा ४-५ भागांची वेब सिरीज फार खोलात शिरून मांडते असं मला जाणवतंय..  हा तर हे सगळं यासाठी की आजच एक वेब सिरीज पाहून संपली.. फक्त ५ भागांची ही मालिका दि गुड गर्ल शो! पेइंग गेस्ट  म्हणून राहणाऱ्या चार मुलींची गोष्ट आणि त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रसंगांना प्रत्येकीने आपापल्या विचारसरणीने केलेला प्रतिकार..  सुरुवातीला आधी कधीतरी मी याचा मधलाच भाग पाहिलेला मला बरा वाटलेला नंतर बघेन म्हटलं पण नंतर नावाचं विसरले.. आज थोड आठवतंय त्यावरून शोध सुरु...

ट्रेन,प्रवास आणि मी

इमेज
☺ट्रेन,प्रवास आणि मी ☺ झूक झूक आगीनगाडी या गाण्यातून आणि मग खेळातून आपल्या आयुष्यात आनंद आणणारी ट्रेन मोठं झाल्यावर नकळत आपल्या जीवनाचा आनंददायी भाग बनते .. हे किती मस्त आहे. आपण सर्वच जण प्रवास करतो .. प्रवास कुणाला आवडत नाही!! पण या प्रवासाची माध्यमं आपल्या आपल्या खास आवडीची असतात .. जसं बस,रेल्वे,विमान,गाडी वगैरे वगैरे पण माझा आवडीचा प्रवास तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात ट्रेन असते. ट्रेन आणि मुंबईकरांचं नातं हे अगदी सलगीच्या सख्य्या मैत्रीसारखा .. बोरिवलीला राहून गिरगावात महाविद्यालयीन शिक् षण म्हणजे माझी आणि ट्रेनची गट्टी जमणं हे अगदी साहजिक आणि अपरिहार्यच.. गावी जाताना होणाऱ्या त्या निळ्या ट्रेनचा प्रवास मात्र नेहमी लक्षात राहतो आणि दुसऱ्या रंगाची राजधानी आणि दुरांतो सुद्धा .... प्रवासात मी अबोल असते जास्त बोलत नाही, फक्त न्याहाळत असते. पण तरी रोजच्या तास दीड तासाचा प्रवास असो वा अगदी दोन दोन दिवसाचा ट्रेन प्रवास असो आठवणींनी मात्र समृद्ध करतोच आणि काहीतरी नवीन देतोच .. पहिल्या प्रवासातला कुतूहल मात्र नक्कीच अजूनही लक्षात आहे.. जे या जाहिरातीत अगदी अचूक...