No matter what it is! Just face it, do not escape!
# pass # fail # Toppers # life # faceit # dontescape हल्ली दहावी बारावी किंवा कसलेही निकाल लागले की लोक त्यांचे वैयक्तिक अनुभव लिहू लागलेत. अधिकतर त्यात असं असतं की, आम्ही अपयशी झालो होतो किंवा आम्हालाही कमी टक्के होते पण आता आम्ही असे असे यशस्वी झालो आहोत वगैरे वगैरे. नापास झालो म्हणजे संपत नाही, ताण घेऊ नका वगैरे. हे असं लिहिलं जाणं गरजेचं आहे. त्याने वाढत असेल आत्मविश्वास! मिळत असेल बळ झुजण्याचं वगैरे!! हे नुसतं निकालाच्या बाबतीत नाही तर आयुष्यात 'सेटल' होण्याबद्दल, वय वाढण्याबद ्दल, आयुष्यात काही ठरवू न शकण्याबद्दल अशा खूप काही गोष्टींमध्ये जिथे माणसांना अपयशाला तोंड द्यावं लागतं त्या प्रत्येक गोष्टीबद्दल लिहिलं जातं. याची गरज वाटून खूप share केलं जातं. पण कोण जाणे कसं मला हल्ली हे नकोसं वाटतं. म्हणजे असा एक काळ खरंच होता जेव्हा अपयशी माणसांवर फार मानसिक अत्याचार व्हायचे. त्यामुळे हे असं सकारात्मक सांगून कोणीतरी प्रेरणा देणं गरजेचं होतं. पण अपयश कसं चांगलं असतं, बडी बडी मंडळी कशी अपयशी होऊन खूप मोठी झाली हे आता मला मात्र नकोसं झालंय. म्...