विद्यापीठात जाणवलेलं एक वास्तव
हा लेख एप्रिल २०१६ मध्ये लिहिला होता .... जे एन यु विद्यापीठात चाललेल्या गदारोळाच्या बातम्या सतत सतत गेले २ महिने नजरेखालून जातायत प्रत्येक बातमी काहीतरी नवी खळबळ माजवत आहे. पण या बातम्या माझ्या मनात नेहमीच तुलना करत राहिल्या जे एन यु च्या या बातम्यांमधून मी जे एन यु च्या विद्यार्थी संघटना तिथली आंदोलने विद्यार्थी शिक्षक यांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांमधील जागरूकता यावर नेटवर कोणाच्या लेखांमधून जे काही मिळेल ते कुतूहलाने वाचायला सुरु केलं कारण माझ तुलनात्मक मन यासाठी मला भरीस पाडत होतं एक student secretary, इतके विद्यार्थी, शिक्षकांची मतं ,प्रत्येक विद्यार्थ्याची काहीतरी मतं आणि आजूबाजूला काय घडतंय याचे तिथल्या प्रत्येकाच्या मनात उमटलेले भाव MUमध्ये तर बाजूच्या विभागातले विद्यार्थी कोणता कार्यक्रम करतायत तिथे काय चाललाय याची माहिती नसते! तुम्हाला वाटेल कि अरे कसली तुलना का करतेय ही? तुलना याचं कारण आता तीन वर्ष सलग माझा मुंबई विद्यापीठाशी एक विद्यार्थी म्हणून संबंध आहे . मी मुंबई विद्यापीठ विभागीय परिषदेची विद्यार्थी सचिव होते.(२०१३-१४) आणि...