रोव्हर्स डेन (भटक्यांची गुहा)
सिंधू नदीच्या किनारी आणि काराकोरम , हिमालय पर्वतरांगांच्या मधोमध वसलेले ठिकाण म्हणजे लेह लडाख . प्रत्येक पर्यटक , गिर्यारोहकांचे स्वप्न असतं की त्याने आयुष्यात एकदा तरी लेह ला भेट द्यावीच . तिथल्या प्राकृतिक सौंदर्याची मोहिनी प्रत्येकाला सतत आकृष्ठ करत असते . उंच उंच पर्वतरांगा , निरभ्र आकाश , निळेशार पाणी आणि त्याहून महत्वाचं म्हणजे चार चार पावलानंतर बदलणारा नजारा यांची भुरळ आपल्यावर पडल्यावाचून राहत नाही . सृष्टी सौंदर्याने परिपूर्ण असलेला हा भाग फिरण्यासाठी दुर्गम असला तरी तिथे जाऊन प्रेयर फ्लॅग कमावण्याचे ध्येय प्रत्येकाला खुणावत असते . म्हणूनच पर्यटक खूप काळजीने या सहलीचं नियोजन करत असतात . तुम्हीही याचं नियोजन करताय का ? आणि त्यातही कमी पैशात जास्त आनंद हा हेतू असेल तर तिथल्या वास्तव्यासाठी एक नवा पर्याय आता उपलब्ध झालेला आहे . हे शक्य केलं आहे ते महाराष्ट्रातील दोन उत्साही तरुण कौस्तुभ दळवी आणि ग्रीष्मा सोले यांनी . गेली सात ते आठ वर्षे ते ...