पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी भाषा दिन [विल्सन महाविद्यालय- मराठी वाङ्मय मंडळ #शताब्दी_सोहळा_विशेष]

इमेज
विल्सन महाविद्यालय मराठी वाङ्मय मंडळ आयोजित आणि  # शताब्दी_सोहळा_विशेष  मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्योत्स्ना प्रकाशनाचे प्रमुख श्री. विकास परांजपे सर आले होते. तेही विल्सोनियन असणं हा आनंद आणखी वेगळाच. त्यांनी विद्यार्थ्यांना आपली 'मराठी भाषा आणि त्यातील नव्या संधी' यावर मार्गर्दर्शन केले. भाषा अभिमान वगैरे वगैरे सगळेच शब्द बाजूला सारत त्यांनी व्याख्यानाच्या सुरवातीपासूनच ''नुसता अभिमान बाळगून भाषेचे कल्याण होत नाही'' हा मुद्दा समोर बसलेल्या प्रत्येकावर ठसवला. आपल्या मराठी भाषेबद्दल बोलताना ते म्हणाले की आपण भाषा वापरताना ग्लोबल ऐवजी संकुचित तर होत नाही ना याकडे लक्ष द्यायलाच हवय .. मराठीत सोपे प्रतिशब्द असतानाही आपण सर्रास हिंदी आणि इंग्रजी शब्द वापरतो तेव्हा आपलीच भाषा आकुंचन पावते. एकाच शब्दाने विविध व्यापक भाव मांडण्याच्या आपल्याला लागलेल्या सवयींनवर त्यांनी टिका केली. उदाहरणादाखल ते म्हणाले सुंदर,छान ,अप्रतिम या शब्दांनी संपूर्ण प्रतिक्रिया विश्वच भरून गेलेलं आहे. उदा. कोणी गाणं गायल्यावर आपण चटकन सुंदर ग...