पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
वाचन प्रेरणा दिन  आज १५ ऑक्टोबर ..  माझ्या आजोबांचा वाढदिवस असतो म्हणून त्या निमित्ताने गावी असताना गेल्या वर्षी मी गावातल्या शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा केला ...  यावेळी वेगळं  काय करू असा विचार मनात असतानाच मला वाचनाची आवड लावलेल्या अनेकांची आठवण मनात गर्दी करू लागली. मग विचार आला यांच्यावरच लिहूया आज...  वाचन ही एक फार 'कूल' गोष्ट आहे ... मस्त फीलिंग देणारी आहे .. माझ्यात हे कुतूहल  माझ्या बाबांमुळे निर्माण झालंय.. त्यांनी माझ्या या कुतूहलाच्या  बीजाला ओळखून  पोषक वातावरण दिलं.. ते मला आधी त्यांनी वाचलेल्या गोष्टी सांगायचे.. वाचलेले विषय शेअर करायचे त्यामुळे आपोआपच मला 'हे आपणसुद्धा वाचायला हवं 'अशी भावना निर्माण होत गेली .. आणि वाढीस लागली.  ते नेहमी त्यांच्या परदेशी मित्रांकडून पुस्तकं मागवायचे अर्थात त्या कादंबऱ्या नव्हत्या ती  त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाची होती.पण मला अजूनही  हे अस परदेशातून पुस्तक मागवण  यात एकदम 'हवा' वाटते. असो मीही मागवेन  वाचनाचा व्यासंग वाढल्यावर :P   ...