पोस्ट्स

जुलै, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पत्रलेखन...

इमेज
पत्रलेखन...  आपल्याला कुणाचं तरी पत्र येणं ,आपण कुणाला तरी पत्र लिहिणं आणि स्वतः ते पाठवणं या गोष्टी अगदी जादुई असतात. खरंच पत्र आपल्या हातात मिळणं किंवा आपल्या हातातून आपल्या माणसाला जाणं हा क्षण म्हणजे आनंदाने ओतप्रोत असतो. 'कदाचित' ही भावना मेल मधून किंवा मेसेज मधून येणाऱ्या पत्रातून नाही समजणार.. पत्र लिहिणं म्हणजे लिहायला घेतो तेव्हाच लिहीण असं नसतं तर जेव्हा मनाच्या किनाऱ्यावर ही पत्र लिहिण्याची उर्मी आदळते तेव्हाच ती पत्रातल्या आठवणींचा ओलावा सोडून जाते.. मग मनात विचारांचे, भावनांचे, आठवणींचे चक्र चालू होते हळूहळू या सगळ्याला थंडावा मिळतो आणि मग भरून आलेले हे नभ पत्रात पेनातून बरसत जातात.. किंवा किबोर्डच्या बटणांतून... पण मला स्वतःला हस्तलिखित पत्र वाचायला जास्त आवडतं.. बदलत्या भावनांनुसार बदललेलं अक्षराचं वळण मनाला सुखावतं. कुणाचही पत्र आपल्याला येणं ही फार मोठी गोष्ट;असते किंबहुना माझ्यासाठी आहेच! इतक्या तंत्रज्ञानाने भरभरून वाहिलेल्या जगात कुणीतरी आपल्यासाठी 'खास' वेळ काढतंय आणि स्वतःच्या हाताने पत्र लिहितंय याप...