आजोळ एक खजिना आनंद लुटण्याचा...
आजोळ एक खजिना आनंद लुटण्याचा... गावचे आठ दिवस… खूप मज्जा *सगळ्यात आधी मस्त मनभरून खाल्लेला रानमेवा *शेतीच्या कामातली मदत (मदत कसली तिकडे पण मज्जाच जास्त) ;) :P *शांत वातावरणात मस्त हवेत मनसोक्त वाचन आणि थोडा अभ्यास *संध्याकाळी तलावावर लुटलेला आनद *मोकळ्या शीतल नभांखाली रात्रीचं पहुडणं *तेव्हाच चांदण्यांनी भरलेल्या आकाशाचे सर्व भावंड आजी आजोबांना माहित आहे तितकं आकाश दर्शन घडवणं गावातली सर्वात उंच टेकडी चढायला जाणं *सगळ्या भावंडांच एकमेकांची गुपितं शेअर करणं आणि मग त्यावरून चिडवणं *जेवताना जेवणापेक्षा जास्त दिवसभरातली मज्जा आठवून हास्यकल्लोळ *एकीकडे जातो सांगून अख्खं गाव फिरून येणं *बघितलेला असो वा नसो पण तरी सगळ्यांनी एकत्र बसून एकतरी चित्रपट बघायचाच कारण ''असली मजा तो सब के साथ आता है''. :D *आणि मग शेवटी आजोळच्या गोड आनंदी मिठीतून नको वाटत असतानाही मुंबईला निघून येणे… मुंबईत पुन्हा रिफ्रेश होऊन मस्त अभ्यासात गढून जायचं :) :D