एक कविता मैत्रीची…
एक कविता मैत्रीची… (दीप्तीच्या वाढदिवसाला सुचली म्हणून तिच्याचसाठी tongue emoticon smile emoticon smile emoticon Dipti ) 18th August 2015 मैत्री आहे अनुरागाने रसरसलेली मैत्री आहे अनेक भावभावनांनी भारलेली मैत्री आहे आस्वाद घेत एकत्र जेवण्याची मैत्री आहे चहाच्या कपात भरून पावलेली मैत्री आहे मिसळसारखी एकदम झणझणीत लागणारी मैत्री आहे पार्टनर इन क्राइम बनण्याची मैत्री आहे नाईट आउट मधल्या शेरिंग ऑफ हार्टची मैत्री आहे अखंड गप्पांत रमलेली मैत्री आहे भेदून टाकणाऱ्या हास्यकाल्लोळाची मैत्री आहे नव्या ओळखीत गप्प राहण्याची मैत्री आहे Mutual Friendsना सामावून घेण्याची मैत्री आहे कशावरही जोक करून हसण्याची मैत्री आहे तोंडावरच सगळ बोलून टाकण्याची मैत्री आहे अनेक विनोदी भांडणांची मैत्री आहे उगाच एकमेकांना दोष देत हळूच आपली चूक मानण्याची मैत्री आहे भांडणानंतर पुन्हा वाढलेल्या प्रेमाची मैत्री आहे स्वभाव जाणून वागण्याची मैत्री आहे एकमेकांना सगळ्यांसकट समजून घेण्याची मैत्री आहे उत्स्फूर्त, दाटून आलेल्या सर्व भावनांच्या प्रकटीकरणाची मैत्री आहे त्याच भावना...