पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
गोष्टी किती सहज घडतात . रोजच्या रोज जगराहाटी चाललेली असते . प्रत्येक व्यक्ती सोमवार ते शनिवार येणाऱ्या रविवार च्या भरवशावर काम करत असतो. सगळं इतक सवयीचं वागणं असतं की  बघणाऱ्या तिसऱ्याला नेहमीच दुसऱ्याच आयुष्य किती सहज वाटत असतं .. पण हे अगणित अंशांनी बनलेलं जग जेव्हा सहज चाललेलं बघतानाच त्यातला प्रत्येक अंश मात्र असंख्य हिंदोळ्यावर झुलताना दिसतो. मनात असंख्य वादळांचे प्रतिसाद झेलत चेहऱ्यावर हास्य नाट्य फुलवण्याचा प्रयत्न इथला प्रत्येक अंश करत असतो . मग राहून राहून वाटत राहत जितकी सहजता जीवनात यायला हवी त्यासाठी लागणारे प्रयत्न तितके सहज नाही कारण ... कारण प्रत्येकासाठीच ... ''हजारो क्वाइशे ऐसी कि हर क्वाईश पे दम  निकले... '' --- to be continued -- आनंदी