जन्म मैत्रीचा...
माझी पहिली कविता…। १३ जानेवारी २०१५ स्थळ : मरीन ड्राईव्ह वेळ : दुपारी १२ च्या आसपास . माझ्या जीवन प्रवासात भेटणाऱ्या आणि माझ्या मनात विविध वैशिष्ट्यांनी घर करणाऱ्या प्रत्येकासाठी …… ''जन्म मैत्रीचा...'' कधी सहज एका ट्रेकला एखाद्या वाक्याने मैत्रीला सुरुवात होते आणि नकळत नाती जुळत जातात..... कधी सहज सहाध्यायी म्हणुन बोललेल्या अनेक वाक्यातून नकळत नाती जुळत जातात.... एकाच युनिव्हर्सिटीत आहोत म्हणून घडलेल्या अनेक भेटींतून नकळत नाती जुळत जातात.... मित्राचा मित्र friend's friend म्हणून घडलेल्या अनेक संवादातून नकळत नाती जुळत जातात.... जुनीच मैत्री पण तीच पुन्हा नव्याने अनुभवतानाही नकळत नाती घट्ट होत जातात..... अशीच नाती जुळत आणि घट्ट होत अस'ताना कधी मन या नात्यांच्या पतंगप्रीतीत मिसळून जाते याचा ठावच लागत नाही ..... -- अश्विनी माने.