" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "
" मानवी समाज आणि अंधश्रद्धा " जी गोष्ट मुळात खरी नसतानाही तिच्यावर विश्वास ठवणे , ती मानणे म्हणजे ' अंधश्रध्दा' , अंधश्रध्दा केवळ अज्ञान नाही तर ती प्रक्रिया आहे . म्हणूनच देवा - ध्रर्माशी तिचं नातं एवढं सरळ आणि सोपं नाही . अमूक - अमूक सांगतो , म्हणून ते खरंच असलं पाहिजे.चिकित्सा करण्याची गरज नाही ' शब्दप्रांमाण्य' आणि ' अचिकित्सा' हे अंधश्रध्दा प्रक्रीयेचे दोन प्रधान घटक आहेत . अंधश्रध्दा हा एक मानसिक दुबळेपणा आहे. मागास व अशिक्षित समाजाचे हे एक वैगुण्य आहे. श्रध्दा आणि अंधश्रध्दा याबद्दलचा वाद तर कायमच चालू असतो. देवधर्मकल्पनेशी त्याची फार सांगड असते. अंधश्रध्देची अनेक उदाहरणे आहेत काही सौम्य तर काही घातक व भयंकर आहेत. · मांजर आडवे जाण्यामुळे काम बिघडते , तीन तिगडा काम बिगडा. · मासिक पाळी अमंगळ असते , विटाळ होतो. · पायाळू ...